---Advertisement---

“मॅक्सवेलवर मोठी बोली लावणे मूर्खपणाचे”, न्यूझीलंडच्या दिग्गजाने मांडली रोखठोक भूमिका

On: बुधवार, जानेवारी 27, 2021 7:11 PM
---Advertisement---

आयपीएलच्या चौदाव्या हंगामाची चर्चा आता जोर धरू लागली आहे. खेळाडूंना कायम राखण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आज (२७ जानेवारी) लिलावाची तारीख ही जाहीर करण्यात आली. १८ फेब्रुवारी रोजी चेन्नई येथे घेण्यात येईल. तत्पूर्वी, अनेक माजी खेळाडू या लिलावाविषयी आपली मते व्यक्त करत आहेत. न्यूझीलंडचा माजी दिग्गज अष्टपैलू खेळाडू स्कॉट स्टायरिशने देखील पुढील लिलावात ऑस्ट्रेलियन फलंदाज ग्लेन मॅक्सवेल याच्यावर मोठी बोली लावणे मुर्खपणाचे ठरेल, असे म्हटले आहे. मॅक्सवेल यावर्षी पुन्हा एकदा लिलावात दिसेल.

“मॅक्सवेलवर मोठी बोली लावणे मुर्खपणाचा निर्णय”

न्यूझीलंडच्या अष्टपैलू खेळाडू राहिलेल्या व सध्या समालोचक म्हणून काम पाहणाऱ्या स्कॉट स्टायरिशने आगामी लिलावाविषयी आपली प्रतिक्रिया दिली. त्याने यावेळी ऑस्ट्रेलियाचा आक्रमक फलंदाज ग्लेन मॅक्सवेलवर निशाणा साधला. स्टायरिश म्हणाला, “मॅक्सवेलवर १० कोटी रुपयांची बोली लावणे हा मुर्खपणाचा निर्णय ठरेल. जास्त पैसे शिल्लक असणारे संघ अशी बोली लावण्याची शक्यता आहे. मात्र मला असे वाटते की, त्याच्या जागी दुसर्‍या कोणाला तरी संधी मिळायला हवी. आपणा सर्वांना माहीत आहे की तो प्रतिभावंत खेळाडू आहे. परंतु, स्वतःच्या कामगिरीने त्याने स्वतःला पुन्हा लिलावात ढकलले आहे. त्याची आधारभूत किंमत किती असेल यावरही बरेच काही अवलंबून आहे.”

मागील हंगामात मॅक्सवेलने केली निराशाजनक कामगिरी

युएई येथे पार पडलेल्या आयपीएलच्या मागील हंगामात मॅक्सवेलची कामगिरी अत्यंत सुमार दर्जाची राहिली होती. मॅक्सवेल या हंगामात तेरा सामने खेळून अवघ्या १०८ धावा बनवू शकला होता. विशेष म्हणजे या तो एकही षटकार मारू शकला नाही. किंग्स इलेव्हन पंजाब संघाने त्याच्यावर १०.७५ कोटींची घसघशीत बोली लावून त्याला आपल्या संघात सामील केले होते. मात्र, तो ही रक्कम वसूल करु देऊ शकला नाही. परिणामी, पंजाबला प्ले ऑफमध्ये स्थान मिळविण्यात अपयश आले.

महत्वाच्या बातम्या:

भारतासाठी असे आहे आयसीसी टेस्ट चॅम्पियनशिपचे समीकरण; इंग्लंड विरुद्ध या फरकाने जिंकावी लागेल मालिका

आयर्लंडविरुद्धच्या दमदार कामगिरीनंतर राशिदने केले मोठे वक्तव्य, म्हणाला

विराट सापडला कायद्याच्या कचाट्यात, मिळाली कायदेशीर नोटीस

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---