---Advertisement---

भारतासाठी असे आहे आयसीसी टेस्ट चॅम्पियनशिपचे समीकरण; इंग्लंड विरुद्ध ‘या’ फरकाने जिंकावी लागेल मालिका

On: बुधवार, जानेवारी 27, 2021 6:25 PM
---Advertisement---

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान नुकतीच बॉर्डर-गावसकर मालिका पार पडली आहे. ब्रिस्बेन येथील शेवटच्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने ऐतिहासिक विजय मिळवत मालिका 2-1 ने जिंकली. भारताच्या या ऐतिहासिक मालिका विजयानंतर आयसीसी टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये देखील मोठे उलटफेर झाले असून, भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला पछाडत प्रथम क्रमांक पटकावला आहे. आयसीसी टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये विजयाच्या टक्केवारीला विशेष महत्व असते . या क्रमवारीतील टॉप 2 संघ आगामी काळात टेस्ट चॅम्पियनशिपसाठी अंतिम सामना खेळणार आहेत.

ब्रिस्बेन येथील विजयाने भारतीय संघ 71.7 इतक्या विजयाच्या टक्केवारीसह प्रथम क्रमांकावर पोहोचला आहे. न्यूझीलंड संघ द्वितीय क्रमांकावर असून त्यांची टक्केवारी 70 इतकी आहे. भारताविरुद्धच्या पराभवाने ऑस्ट्रेलियन संघ तिसऱ्या स्थानावर घसरला असून त्यांची विजयाची टक्केवारी 69.2 आहे. इंग्लंडने नुकताच श्रीलंका विरुद्ध 2-0 ने विजय मिळवल्याने त्यांची गुणांची टक्केवारी 68.7%% इतकी झाली आहे.

भारताला टॉप 2 मधील आपले स्थान पक्के करण्यासाठी इंग्लंड विरुद्ध 2 विजयाच्या फरकाने मालिका जिंकणे आवश्यक आहे. मात्र जर भारतीय संघ 3 -0 अथवा 4-0 ने पराभूत झाला तर भारतीय संघाच्या अंतिम सामन्यात खेळण्याच्या आशा धुळीस मिळतील. इंग्लंडला टॉप 2 मध्ये स्थान मिळवण्यासाठी 3 -0 ने विजय मिळवणे आवश्यक आहे.

मात्र सर्व क्रिकेटप्रेमींना आशा असेल की आत्मविश्वास वाढलेल्या भारतीय संघाला मायदेशात इंग्लंड विरुद्ध विजय मिळवणे फारसे अवघड जाणार नाही.

महत्त्वाच्या बातम्या –

एक वर्षांनंतर भारतीय कसोटी संघात पुनरागमन करणार इशांत शर्मा; ‘या’ संघाविरुद्ध खेळला होता शेवटचा सामना

आयर्लंडविरुद्धच्या दमदार कामगिरीनंतर राशिदने केले मोठे वक्तव्य, म्हणाला…

विराट सापडला कायद्याच्या कचाट्यात, मिळाली कायदेशीर नोटीस

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---