---Advertisement---

भारत विरुद्ध विंडिज: दुसऱ्या वनडे सामन्याच्या ठिकाणात बदल; आता या शहरात होणार हा सामना

On: बुधवार, ऑक्टोबर 3, 2018 8:25 PM
---Advertisement---

विंडिजचा संघ सध्या भारत दौऱ्यावर आला आहे. या दौऱ्यातील कसोटी मालिकेची उद्या (4 आॅक्टोबर) पासून सुरुवात होणार आहे. तसेच दोन सामन्यांची ही कसोटी मालिका संपल्यानंतर भारत आणि विंडिजमध्ये  21 ऑक्टोबरपासून 5 वनडे सामन्यांची मालिका होणार आहे.

या वनडे मालिकेतील दुसरा सामना हा 24 ऑक्टोबरला होळकर स्टेडियम,इंदोर येथे पूर्वी खेळवण्यात येणार होता. पण आता बीसीसीआयने या सामन्याच्या ठिकाणात बदल केला आहे.

त्यामुळे आता हा सामना विशाखापट्टणम येथील डॉ. वाय एस राजसखरा रेड्डी एसीए-व्हिडीसीए क्रिकेट स्टेडीयमवर होणार आहे. याबद्दल बीसीसीआयने अधिकृत वेबसाइटवर माहिती दिली आहे.

या वनडे मालिकेतील पहिला सामना गुवाहाटीला होणार आहे. तर तिसरा आणि चौथा सामना अनुक्रमे पुणे आणि मुंबई येथे होईल. तसेच 1 नोव्हेंबरला होणारा शेवटचा वनडे सामना तिरुअनंतपुरमला होईल.

या वनडे मालिकेनंतर या दोन संघात तीन टी20 सामन्यांची मालिका पार पडेल.

असे आहे विंडीजच्या भारत दौऱ्याचे वेळापत्रक-

कसोटी मालिका-

पहिली कसोटी- 4 ते 8 ऑक्टोबर (सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, राजकोट)

दुसरी कसोटी- 12 ते 16 ऑक्टोबर (राजीव गांधी स्टेडियम, हैदराबाद)

वनडे मालिका-

पहिला वनडे सामना- 21 ऑक्टोबर (बारसपारा स्टेडियम, गुवाहटी)

दुसरा वनडे सामना- 24 ऑक्टोबर ( डॉ. वाय एस राजसखरा रेड्डी एसीए-व्हिडीसीए क्रिकेट स्टेडीयम,विशाखापट्टणम)

तिसरा वनडे सामना- 27 ऑक्टोबर (महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, पुणे)

चौथा वनडे सामना- 29 ऑक्टोबर (वानखेडे स्टेडियम, मुंबई)

पाचवा वनडे सामना- 1 नोव्हेंबर (ग्रिनफिल्ड स्टेडियम, तिरुअनंतपुरम)

टी20 मालिका-

पहिला टी20 सामना- 4 नोव्हेंबर (इडन गार्डन्स, कोलकाता)

दुसरा टी20 सामना- 6 नोव्हेंबर (एकाना इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम, लखनऊ)

तिसरा टी20 सामना- 11 नोव्हेंबर (चेपॉक स्टेडियम, चेन्नई)

महत्त्वाच्या बातम्या-

पृथ्वी शॉसोबत कर्णधार कोहलीने साधला चक्क मराठीत संवाद

टॉप ५: भारत विरुद्ध विंडिज यांच्यातील कसोटी मालिकेत होणार हे खास विक्रम

कसोटी मालिकेत निवड झालेल्या त्या ३ खेळाडूंबद्दल गांगुलीने केले मोठे भाष्य

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment