---Advertisement---

भारतीय खेळाडूंचा आयपीएल खेळण्याचा मार्ग मोकळा, दुसऱ्यांदा कोरोना चाचणीचा निकाल निगेटिव्ह, पण…

On: रविवार, सप्टेंबर 12, 2021 7:43 AM
Team-India
---Advertisement---

इंग्लंड विरुद्ध भारत या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पाचवा आणि अंतिम कसोटी सामना ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानावर पार पडणार होता. या मालिकेत भारतीय संघ २-१ ने आघाडीवर होता. त्यामुळे हा सामना भारतीय संघासाठी अतिशय महत्वाचा होता. परंतु भारतीय संघाच्या ताफ्यात कोरोनाचा शिरकाव झाल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. तसेच खेळाडूंनी अंतिम कसोटी सामना खेळण्यास नकार दिला होता. त्यामुळे बीसीसीआय आणि ईसीबीने मिळून हा सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान भारतीय खेळाडूंची दुसऱ्यांदा आरटी-पीसीआर चाचणी करण्यात आली होती, ज्याचा निकाल आता समोर आला आहे.

मालिकेतील चौथा कसोटी सामना सुरू असताना रवी शास्त्री यांना कोरोनाची लागण झाली होती. रवी शास्त्री यांनी खाजगी सोहळ्याला हजेरी लावल्यामुळे त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे म्हटले जात होते. दरम्यान भारतीय सपोर्ट स्टाफ मधील सदस्यांना देखील कोरोनाची लागण झाल्यानंतर भारतीय संघाच्या ताफ्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे भारतीय संघातील खेळाडूंनी हा सामना खेळण्यास नकार दिला होता. ज्यामुळे दोन्ही बोर्डने मिळून हा सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला.

दरम्यान ईसीबीचे असे मत होते की, इंग्लंडला या सामन्यात विजेता घोषित करावे. परंतु बीसीसीआयनेही आपली भूमिका स्पष्ट करत म्हटले की, अंतिम कसोटी सामना नंतर कधीतरी पुन्हा आयोजित करण्यात येईल.

ओल्ड ट्रॅफर्ड कसोटी सामना सुरू होण्यापूर्वी भारतीय खेळाडूंची आरटी-पीसीआर चाचणी करण्यात आली होती. यामध्ये सर्व खेळाडूंचा अहवाल निगेटिव्ह आला होता. परंतु सपोर्ट स्टाफ मधील सदस्यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर पुन्हा एकदा खेळाडूंची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, ही चाचणी निगेटिव्ह आली आहे. हे सर्व खेळाडू आता आयपीएल स्पर्धेत सहभागी होऊ शकतात. परंतु आयपीएल स्पर्धेच्या नियमांनुसार, या खेळाडूंना ६ दिवस विलगिकणात राहावे लागणार आहे. त्यानंतर हे खेळाडू आप आपल्या संघातील बायो बबलमध्ये प्रवेश करतील.

यादरम्यान जर कुठल्या खेळाडूचा कोरोना अहवाल जर पॉझिटिव्ह आला तर, त्याला १४ दिवस विलगीकरणात राहावे लागू शकते. तसेच त्याला सुरुवातीच्या काही सामन्यांना देखील मुकावे लागू शकते. आयपीएल (इंडियन प्रीमियर लीग) २०२१ स्पर्धेचा दुसरा हंगाम येत्या १९ सप्टेंबरपासून युएईमध्ये पार पडणार आहे. या स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात खेळाडूंना कोरोनाची लागण होऊ लागली होती. ज्यामुळे ही स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली होती.

महत्त्वाच्या बातम्या-

सिक्सर किंग! कसोटी क्रिकेटमध्ये ‘या’ ३ भारतीयांनी ठोकलेत सर्वाधिक षटकार

‘या’ ३ खेळाडूंना टी२० विश्वचषकालाठी भारतीय संघात स्थान न देणे ठरू शकते घोडचूक

टी२० विश्वचषकासाठी भारतीय संघाची निवड करताना निवड समीतीने घेतले ‘हे’ ३ धक्कादायक निर्णय

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---