---Advertisement---

राजस्थान रॉयल्सचे भवितव्य त्यांच्याच हाती, ‘असे’ आहे प्लेऑफमध्ये पोहोचण्याचे समीकरण

On: मंगळवार, ऑक्टोबर 5, 2021 3:50 PM
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धा आता शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे. येत्या १५ ऑक्टोबर रोजी या स्पर्धेचा अंतिम सामना दुबईच्या दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर पार पडणार आहे. तत्पूर्वी चेन्नई सुपर किंग्स, दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर या तीन संघांनी प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे. तर चौथ्या स्थानासाठी कोलकाता नाईट रायडर्स, मुंबई इंडियन्स, पंजाब किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स या संघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे.

दरम्यान मंगळवारी (५ ऑक्टोबर) राजस्थान रॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स या दोन्ही संघांमध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळणार आहे. जो संघ या सामन्यात पराभूत होईल तो संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर होऊ शकतो.

असे असेल राजस्थान रॉयल्स संघाचे प्लेऑफमध्ये पोहचण्याचे समीकरण 

राजस्थान रॉयल्स संघाचे प्लेऑफमध्ये पोहचण्याचे समीकरण अगदी सोपे आहे. राजस्थान रॉयल्स संघाने आतापर्यंत एकूण १२ सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्यांना ५ सामन्यात विजय मिळवण्यात यश आले आहे. तर ७ सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. तसेच मुंबई इंडियन्स संघाने देखील १२ सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्यांना ५ सामन्यात विजय मिळवण्यात यश आले आहे. जरी दोन्ही संघांचे गुण सारखे असले तरीही, राजस्थान संघ नेट रन रेटमुळे सहाव्या तर मुंबई संघ सातव्या स्थानी आहे.

त्यामुळे जर राजस्थान संघाला मुंबई इंडियन्स संघाविरुद्ध होणाऱ्या सामन्यात विजय मिळवण्यात यश आले तर, हा संघ गुण आणि प्लेऑफच्या बळावर मुंबई आणि पंजाबच्या पुढे निघून जाईल. त्यांनतर त्यांच्यापुढे फक्त कोलकाता संघाचे आव्हान असेल. परंतु राजस्थानच्या प्लेऑफच्या आशा कोलकाताच्या जय-पराजयावरही निर्भर असतील.

आयपीएल २०२१ स्पर्धेच्या गुणतालिकेत युवा रिषभ पंतच्या नेतृत्वाखाली खेळणारा दिल्ली कॅपिटल्स संघ २० गुणांसह अव्वल स्थानी आहे. तर चेन्नई सुपर किंग्स संघ या यादीत १८ गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. तसेच विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणारा रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला देखील या स्पर्धेत विजयाचे प्रबळ दावेदार मानले जात आहे. हा संघ संघ १६ गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे. तर प्लेऑफचे चौथे स्थान मिळवण्यासाठी कोलकाता नाईट रायडर्स, पंजाब किंग्स, राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स या संघांमध्ये चांगलीच स्पर्धा रंगली आहे.

मुंबई इंडियन्सविरुद्ध होणाऱ्या सामन्यात अशी असू शकते राजस्थान रॉयल्सची प्लेइंग ईलेव्हन
एविन लुईस, यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन (कर्णधार आणि यष्टिरक्षक),शिवम दुबे, ग्लेन फिलिप्स, डेविड मिलर, राहुल तेवतिया, मयंक मरकंडे, मुस्तफिझुर रहमान, आकाश सिंग आणि चेतन सकारिया

महत्त्वाच्या बातम्या-

मोक्याच्या क्षणी ९.२५ कोटीच्या खेळाडूकडून घोडचूक, मग काय सीएसकेने सामनाही गमावला अन् अव्वल स्थानही

मुंबई वि. राजस्थानमध्ये ‘करा वा मरा’ मुकाबला, प्लेऑफच्या शर्यतीत टिकण्याची शेवटची संधी

शिष्याच्या हातून पराभूत झाल्यानंतर गुरू धोनीचे अनोखे कारण; म्हणाला, ‘उंच काठीच्या गोलंदाजांमुळे आम्ही…’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---