कर्जत-जामखेडचे आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार याच्या खांद्यावर नवीन जबाबदारी येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आजोबा शरद पवार (Sharad Pawar) यांच्यानंतर आता त्यांचे नातू रोहित पवार क्रिकेटच्या मैदानात उतरणार आहेत. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन म्हणजेत एमसीएसच्या सदस्यपदी रोहित पवारांची निवड झाली असून ते असोसिएशनचे अध्यक्ष बनण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.
महाराष्ट्री क्रिकेट असोसिएशनची बैठक रविवारी (8 जानेवारी) पुण्याच्या गहुंजे स्टेडियवर सुरू आहे. या बैठकीत रोहित पवार (Rohit Pawar) यांना क्लब गटाकडून सदस्यपदी निवडले गेले. आता त्यांचे नाव एमसीएच्या अध्यक्षपदासाठी चर्चेत असल्याचे सांगितले जात आहे. आमदार पवार एमसीएच्या 16 सदस्यीय समितीत नव्याने जोडले गेले असून बैठकीत असोसिएशनच्या अध्यक्षपदाविषयी मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो.
दरम्यान, रोहित पवारांचे आजोबा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार देखील यापूर्वी एमसीएच्या अध्यक्ष राहिले आहेत. शरद पवारांनी 2013 आणि त्याआधी 2001-02 मध्ये एमसीएच्या अध्यक्षपदाची भूमिका पार पाडली होती. आता शरद पवारांचा हा वारसा रोहित पवार पुढे चावतील, अशी अपेक्षा त्यांच्या समर्धकाना आहे. त्याव्यतिरिक्त शरद पवार बीसीसीआय आणि आयसीसीचे अध्यक्ष देखील राहिले आहेत.
रोहित पवारांना स्वतःला देखील क्रिकेटची खास आवड आहे. त्यांना अनेकदा सर्वसामन्यांसोबत क्रिकेट खेळताना पाहिले गेले आहे. पवारांनी स्वतःच्या सोशल मीडिया खात्यावरून देखील अनेकदा त्यांच्या मतदारसंघातील संघांसोबत क्रिकेट खेळतानाचे फोटो शेअर केले आहेत. (Selection of Rohit Pawar in 16 member committee of MCA)
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आयपीएल न खेळता पंत मालामाल! बीसीसीआय मोजणार 21 कोटींची रक्कम
AUSvSA: सिडनी कसोटी अनिर्णीत राहिल्याचा भारताला फायदा, ऑस्ट्रेलिया-दक्षिण आफ्रिकेचे मात्र नुकसान