---Advertisement---

विराटचे कर्णधारपद, तर अजिंक्यचे उपकर्णधारपद धोक्यात, बीसीसीआयने दिला इशारा

On: सोमवार, डिसेंबर 6, 2021 10:09 AM
---Advertisement---

मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर भारत विरुद्ध न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये दुसरा कसोटी सामना झाला. ही मालिका झाल्यानंतर भारतीय संघ दक्षिण आफ्रिका संघासोबत दोन हात करणार आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी रविवारी (५ डिसेंबर) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (बीसीसीआयची) एक बैठक पार पडली. ज्यामध्ये भारतीय कर्णधार विराट कोहलीच्या वनडे संघाच्या नेतृत्वाबद्दल चर्चा करण्यात आली आहे.

विराट कोहलीने आयसीसी टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धा झाल्यानंतर टी२० संघाचे कर्णधारपद सोडले होते. त्यानंतर त्याने वनडे संघाचे ही कर्णधारपद सोडावे, अशी मागणी जोर धरू लागली होती. विराटने टी२० संघाचे कर्णधारपद सोडल्यानंतर हे पद रोहित शर्माला सोपवण्यात आले आहे. अशातच विराटने वनडे संघाचे ही कर्णधारपद सोडून फक्त कसोटी क्रिकेटवर लक्ष केंद्रित करावे, अशी चर्चा या बैठकीमध्ये करण्यात आली आहे.

भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेत पहिला कसोटी सामना २६ डिसेंबरपासून खेळणार आहे. ऑमीक्रॉनची भीती पाहता हा दौरा पुढे ढकलण्यात आला आहे. यापूर्वी १७ डिसेंबर पासून हा दौरा सुरू होणार होता. पीटीआयच्या एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, चेतन शर्माच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत निवडकर्त्यांनी रोहित शर्माला वनडे संघाचे कर्णधारपद देण्याचा मुद्दा मांडला आहे. परंतु, याबाबत कुठलाही निर्णय घेण्यात आला नाहीये.

तसेच कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे सतत फ्लॉप ठरतोय. यामुळे या संघाचे उपकर्णधारपद देखील रोहित शर्माला देण्यात यावे अशी देखील चर्चा या बैठकीमध्ये करण्यात आली. असे म्हटले जात आहे की, अजिंक्य रहाणेला दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर संधी दिली जाईल. परंतु, त्याला प्लेइंग ईलेव्हेनमध्ये स्थान मिळण्याची शक्यता खूप कमी आहे. यासह शिखर धवन आणि ईशान किशन यांना कसोटी संघात स्थान देण्याबाबत देखील चर्चा करण्यात आली.

महत्त्वाच्या बातम्या – 

‘शुबमन गिलची चांगली सुरुवात, पण…’, सचिन तेंडुलकरने दिली मोठी प्रतिक्रिया

मराठीत माहिती- क्रिकेटर श्रेयस अय्यर

गोष्ट एका क्रिकेटपटूची भाग २०: सचिनचा चाहता ते सचिनचा संघसहकारी झालेला आरपी सिंग

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---