विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना पार पडल्यानंतर भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज शुबमन गिल दुखापतग्रस्त असल्याचे उघडकीस आले होते. शुबमन गिलची दुखापत गंभीर असल्यामुळे त्याला इंग्लंड संघाविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेतून माघार घ्यावी लागली आहे. त्यामुळे त्याच्याऐवजी पृथ्वी शॉला इंग्लंडला बोलवा ही मागणी जोर धरू लागली होती. याबाबत निवडकर्त्यांनी महत्वाचा निर्णय घेतला आहे.
शुबमन गिल कसोटी मालिकेतून बाहेर झाल्यानंतर श्रीलंका दौऱ्यावर असलेल्या पृथ्वी शॉला इंग्लंडला बोलवण्याची चर्चा सर्वत्र रंगू लागली आहे. मात्र स्पोर्ट्स तकच्या वृत्तानुसार, श्रीलंकेहून दोन सलामी फलंदाज इंग्लंडला पाठवण्याची मागणी निवडकर्त्यांनी फेटाळून लावली आहे. तसेच असाही दावा करण्यात आला आहे की, शुबमन गिल जर मालिकेतून बाहेर झाला तर रोहित शर्मा सोबत मयंक अगरवाल सलामीला फलंदाजी करेल. तसेच अभिमन्यु ईश्वरनला देखील संघात स्थान देण्यात येऊ शकते.
असे म्हटले जात होते की, भारतीय संघाला पृथ्वी शॉ इंग्लंड दौऱ्यावर सलामी फलंदाज म्हणून हवा आहे. परंतु माध्यमातील वृत्तानुसार तो श्रीलंका संघाविरुद्ध होणाऱ्या मालिकेत सलामी फलंदाज म्हणून उतरणार आहे. (Selectors have turned down team India’s request to send 2 backup openers mayank Agarwal will open)
सलामी फलंदाजीसाठी केएल राहुल देखील आहे उत्तम पर्याय
भारतीय संघात मयंक अगरवालसह केएल राहुलसारखा विस्फोटक फलंदाज देखील आहे, ज्याने कसोटी क्रिकेटमध्ये ५ शतके झळकावली आहेत. परंतु निराशाजनक कामगिरीमुळे त्याला संघातून बाहेर करण्यात आले होते. त्याने शेवटचा कसोटी सामना २०१९मध्ये खेळला होता. जर भारतीय संघ ७ फलंदाजांसह मैदानात उतरला तर केएल राहुल मध्यक्रमात देखील फलंदाजी करताना दिसून येऊ शकतो.
अभिमन्यु ईश्वरनबद्दल बोलायचे झाले तर, बंगालसाठी प्रथम श्रेणी क्रिकेट खेळणाऱ्या या फलंदाजाने आपल्या कामगिरीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ६४ सामन्यात ४३.६ च्या सरासरीने ४४०१ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने १३ शतके आणि १८ अर्धशतके झळकावली आहेत. तसेच २३३ धावा ही त्याची सर्वोत्तम खेळी आहे.
महत्वाच्या बातम्या-
एमएस धोनीचे कर्णधार म्हणून घेतलेले खतरनाक ३ निर्णय, ज्यांनी सामना एकहाती फिरवला
निष्काळजीपणाने वाढवली चिंता! इंग्लंडच्या ताफ्यात कोरोनाचा शिरकाव, तरीही विराटसेनेच्या सुट्ट्या सुरूच
अशा ५ घटना, ज्यामुळे धोनीने जिंकलं क्रिकेटप्रेमींचं मनं