ऍडलेड। मंगळवारी(15 जानेवारी) भारताने ऑस्ट्रेलिया विरुद्ध दुसऱ्या वनडे सामन्यात 6 विकेट्सने विजय मिळवत तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली आहे. भारताच्या या विजयात कर्णधार विराट कोहलीने शतकी खेळी तर एमएस धोनीने नाबाद अर्धशतक करत मोलाचा वाटा उचलला आहे.
धोनीने त्याचे अर्धशतक 53 चेंडूत षटकार खेचत पूर्ण केले. विशेष म्हणजे हा षटकार जेव्हा धोनीने मारला तेव्हा त्याच्या हेही लक्षात नव्हते की त्याचे अर्धशतक पूर्ण झाले आहे. त्यामुळे त्याच्याबरोबर फलंदाजी करत असलेल्या दिनेश कार्तिकने त्याला अर्धशतक झाल्याची आठवण करुन दिली. त्यानंतर धोनीने बॅट उंचावत अर्धशतकाचे सेलिब्रेशन केले.
धोनीचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. त्याच्या चाहत्यांनी त्याच्या निस्वार्थीपणाचे कौतुक सोशल मीडियावरुन केले आहे.
https://twitter.com/tweetstonaveen/status/1085211323909062657
या सामन्यात ऑस्ट्रेलियाने ठेवलेल्या 299 धावांचा पाठलाग करताना भारताला विजयासाठी शेवटच्या षटकात 7 धावांची गरज होती. या षटकात ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जेसन बेर्हेनडॉर्फ गोलंदाजी करत होता.
पण त्याच्या पहिल्याच चेंडूवर धोनीने षटकार ठोकत त्याचे वनडे क्रिकेटमधील हे 69 वे अर्धशतक पूर्ण केले आणि भारताचा विजयही निश्चित केला. धोनीने दुसऱ्या चेंडूवर एक धाव काढत भारताला या सामन्यात विजय मिळवून दिला.
धोनीने या सामन्यात 54 चेंडूत 101.85 च्या सरासरीने नाबाद 55 धावा केल्या. या खेळीत त्याने 2 षटकार मारले आहेत. त्याने कोहलीबरोबर चौथ्या विकेटसाठी 82 धावांची आणि कार्तिकबरोबर पाचव्या विकेटसाठी नाबाद 57 धावांची भागीदारी केली.
महत्त्वाच्या बातम्या-
–बोट फ्रॅक्चर होते, तरीही त्या भारतीय फलंदाजाने संघहितासाठी केली एकाच हाताने फलंदाजी
–मुंबई पोलिसांच्या ट्वीटरवरुन हार्दिक पंड्या-केएल राहुलला मिळाला धडा