पुणे : श्रावणी कटके आणि स्वराज कोकाटे यांनी ३२ व्या वरिष्ठ गटाच्या राष्ट्रीय वुशू अजिंक्यपद स्पर्धेत चमकदार कामगिरी केली. अखिल महाराष्ट्र वुशू संघटनेच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
आॅल महाराष्ट्र वुशू (Wushu) असोसिएशनच्या वतीने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत श्रावणी कटकेने महिला दुहेरीमध्ये तृप्ती चांदवडकरसह सुवर्णपदक मिळवले. त्याचबरोबर वैयक्तिक गटात ताईचीक्वॉन आणि तायचीजैन या प्रकारात अनुक्रमे रौप्य पदक आणि कांस्य पदक मिळवले. त्याचबरोबर सांघिक मध्ये महाराष्ट्रच्या संघाने रौप्यपदक मिळवले. त्या संघातही श्रावणीचा समावेश होता. स्वराज कोकाटने नानगूनमध्ये सुवर्णपदकाची कमाई केली. सांघिक रौप्यपदकातही त्याने मोलाची कामगिरी केली.अखिल महाराष्ट्र वूश संघटनेचे महासचिव सोपान कटके यांनी या स्पर्धेचे आयोजन केले होते.
या स्पर्धेचे उद्घाटन श्री जितेंद्र बाजवा अध्यक्ष असोसिएशन ऑफ इंडिया यांच्या हस्ते झाले. या वेळी शोगिनी टेक्नोआर्टसचे निर्मिती संचालक ऋषिकेश मोडक, भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या हंगामी समितीचे सदस्य भूपेंद्रसिंह बाजवा, रवींद्र डांगे आयुक्त जीएसटी विभाग पुणे, संभाजी झेंडे अध्यक्ष ऑल महाराष्ट्र वुशू असोसिएशन, चंद्रकांत कांबळे सहसंचालक क्रीडा व युवक सेवा संचनालय महाराष्ट्र राज्य, विजय सराफ, सुहेल अहंमद, नामदेव शिरगावकर महासचिव महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन, बाळासाहेब पोळ, सचिन मोरे, अमित कांकरिया आदी उपस्थित होते.
पदक विजेते खेळाडू – सान्शू – ५२ किलो – सोमनाथ गुंजाळ (ब्राँझपदक), ६० किलो – ऋषीकेश मलोरे (ब्राँझपदक). ताओलू – श्रावणी कटके – (तैजिक्वानमध्ये ब्राँझपदक आणि तैजिजैनमध्ये रौप्यपदक). स्वराज कोकाटे (नानगूनमध्ये सुवर्ण). प्रफुल्ल देशमुख (विंगचूनमध्ये ब्राँझपदक), सतीश दहीफळे (तैजिक्वानमध्ये ब्राँझपदक), वैष्णवी बांदबुचे (तैजिक्वानमध्ये रौप्यपदक), अंकिता भांगे (विंगू चूनमध्ये ब्राँझपदक), नयन निर्मल (नानक्वानमध्ये आणि फ्लेक्झिबल विपनमध्ये रौप्यपदक).दुहेरी – तृप्ती चांदवडकर – श्रावणी कटके (सुवर्णपदक), सांघिकमध्ये रौप्यपदक – श्रावणी कटके, तृप्ती चांदवडकर, सलोनी जाधव, खुशी तेलकर, निखिल जाधव, ओंकार मोडक, स्वराज कोकाटे. (Senior Group National Wushu Championship; Shravani Katke, Swaraj Kokate victory)
महत्वाच्या बातम्या –
करियरचा 100वी कसोटी स्मिथनं यादगार बनवलीच! फिल्डिंर म्हणून कोरलं इतिहासात नाव
विकेट्सचं पंचक! हेडिंग्ले कसोटीत पॅट कमिन्सने उडवला इंग्लिश फलंदाजांचा धुव्वा