---Advertisement---

टीम इंडियात 5 दिग्गज खेळाडू, तरीही ज्युनीयर क्रिकेटरला केले वनडे-टी20 उपकर्णधार

Team-India
---Advertisement---

आगामी श्रीलंका दाैऱ्यासाठी बीसीसीआयने काल(18 जुलै) टीम इंडियाची घोषणा केली आहे. भारतीय संघ 27 जुलै पासून श्रीलंका दाैरा करणार आहे. ज्यामध्ये संघाला 3 वनडे आणि 3 टी20 सामने खेळायचे आहे. त्याचप्रमाणे भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक गाैतम गंभीरचा हेड कोच म्हणून कार्यकाळ देखील या मालिकेपासून सुरुवात होणार आहे. दरम्यान निवड सामितीच्या संघ निवडीबाबत अनेक प्रश्न निर्माण होत आहेत.

वास्तविक, टीम इंडियामध्ये वरिष्ठ आणि दिग्गज खेळाडू असताना दोन्ही फाॅरमटमध्ये टीम इंडियाचे उपकर्णधारपद शुबमन गिलकडे देण्यात आले आहे. तर निवड समितीच्या या निर्णयांवर सोशल मीडियावर खूप चर्चा होत आहे. तर दुसरा म्हत्वाचा निर्णय म्हणजे टी20 मध्ये शानदार कामगिरी करत असलेल्या ऋतुराज गायकवाडला संघातून वगळण्यात आले आहे. त्यामुळे बीसीसीआय आणि निवड समितीचे यामागे नेमकी काय धोरण आहे हे अद्याप समोर आलेले नाही.

आलिकडेच शुबमन गिलच्या नेतृत्वात खेळल्या गेलेल्या झिम्बाब्वे विरुद्ध टीम इंडियाने टी20 मालिका जिंकली होती. ज्यामध्ये युवा खेळाडूंनी शानदार कामगिरी केली होती. दरम्यान पदापर्णाच्या मालिकेतच शतक ठोकलेल्या अभिषेक शर्माला देखील संघात स्थान मिळाले नाहीये. दरम्यान या टी20 मध्ये भारतीय संघाचे नेतृत्व सूर्यकुमार यादवकडे सोपवण्यात आले आहे.

श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या 3 वनडे आणि 3 टी20 सामन्यांच्या मालिकेसाठी टीम इंडिया

टी20- सुर्याकुमार यादव (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), यशस्वी जयसवाल, रिंकू सिंग, रियान पराग, रिषभ पंत (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, खलील अहमद, मोहम्मद सिराज

वनडे मालिका: रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, केएल राहुल (यष्टीरक्षक), रिषभ पंत (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, शिवम दुबे, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, रियान पराग, अक्षर पटेल, खलील अहमद, हर्षित राणा

महत्तवाच्या बातम्या-

हार्दिक-नताशाच्या मुलाची कस्टडी कुणाकडे रहणार? पहा काय सांगतेय हार्दिकची पोस्ट
बिग ब्रेकिंग ! अखेर हार्दिक पांड्या आणि नताशा यांचा घटस्फोट, हार्दिकने स्वतः दिली माहिती
याला दुर्दैव असेच म्हणावे का? टी20मध्ये जबरदस्त कामगिरी, तरीही दिग्गज खेळाडूचा श्रीलंका दौऱ्यातून वगळले

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---