१९ वर्षांपूर्वी रिंगणात उतरलेल्या सोनम मलिकने अखेर आपले वडील कुस्तीगीर राजेंद्र मलिक यांचे स्वप्न साकार करण्यासाठी जी शपथ घेतली होती ती अखेर फळाला लागली. हरियाणाच्या सोनम मलिकने २०१६ च्या ऑलम्पिकमधील कांस्यपदक विजेती साक्षी मलिकचा पराभव करून राष्ट्रकुल कुस्ती स्पर्धा जिंकली. ताजनगरी येथे आयोजित वरिष्ठ राष्ट्रीय महिला कुस्ती स्पर्धेत तिने ६२ किलो गटात साक्षीला ७-५ ने हरवून सुवर्णपदक जिंकले.
साक्षीवर सोनमचा हा सलग तिसरा विजय आहे. तिने २०२० मध्ये आशियाई चॅम्पियनशिप आणि आशियाई ऑलम्पिक पात्रतामध्ये सुद्धा साक्षीला पराभूत केले होते. आपल्या विजयाचे श्रेय ती तिचे प्रशिक्षक अजमेर मलिक यांना दिले आहे. त्यांनी आपल्याला उत्तम प्रशिक्षण दिल्यामुळे मी आज हे सुवर्णपदक जिंकू शकले असे तिचे म्हणणे आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे, सोनम मलिकच्या उजव्या हाताला २०१८ मध्ये लकवा मारला होता. त्यामुळे ती सहा महिने कुस्तीपासून दूर राहिली. तिच्या या हातामुळे तिची कारकीर्द सुरू होण्यापूर्वीच धोक्यात आली असल्याचे दिसून येत होते. २०१७ मध्ये वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकल्यानंतर सोनमला उजव्या हाताची समस्या होत राहिली. त्यामुळे २०१८ मध्ये तिला कसोटी चॅम्पियनशिप अर्ध्यावरच सोडावी लागली.
डॉक्टरांनी तिला सलग सहा महिने आराम करायला सांगितले होते. तरीही तिला हातदेखील वर करायला अडचण येत होती. म्हणून अगदी डॉक्टरांनी देखील तिच्या या आजारपुढे हात टेकले होते. परंतु साक्षी मलिक आणि तिच्या वडिलांनी हार न मानता आयुर्वेदिक औषधांचा उपचार केला आणि तिच्यावर या औषधांचा परिणाम होऊन ती ठीक झाली.
वरिष्ठ राष्ट्रीय महिला कुस्ती स्पर्धेत सर्वाचं लक्ष होतं ते रिओ ऑलम्पिकमधील कांस्यपदक विजेती साक्षी मलिक हिच्याकडे. साक्षीने आपला पहिला उपांत्यपूर्व सामन्यात गुजरातच्या ज्योती भादोरीयाविरुद्ध खेळला आणि या सामन्यात ज्योतीला पराभूत केले. त्यानंतर तिने मध्य प्रदेशच्या पुष्पाचा ४-० ने पराभव केला. उपांत्य सामन्यात दिल्लीच्या अनिताला १०-० च्या मोठ्या फरकाने पराभूत केले. परंतु हरियाणाच्या सोनम मलिकसोबत अंतिम सामना खेळताना तिला पराभवाला सामोरे जावे लागले आणि अखेर सोनम मलिकने विजयाची झेप घेतली.
महत्त्वाच्या बातम्या-
कराडजवळ भीषण कार अपघात; पुण्यातील तीन पैलवानांना गमवावा लागला जीव
‘दंगल गर्ल’ बबिता फोगटच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन, खास ट्विट करत दिली माहिती
संपूर्ण यादी: आजपर्यंतचे महाराष्ट्र केसरी कुस्ती गदेचे मानकरी