जगभरातील खेळांची सर्वात मोठी स्पर्धा म्हणजे ऑलम्पिक. ही स्पर्धा यावर्षी जपानमध्ये टोकियो येथे होणार आहे. या स्पर्धेत अनेक देशांमधून अनेक प्रतिभाशाली खेळाडू खेळणार आहे. अनेक दिग्गज खेळाडूंचाही यात सहभाग असेल. मात्र आता एका अव्वल टेनिस खेळाडूने ऑलम्पिकमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे.
अमेरिकेची टेनिस स्टार सेरेना विल्यम्स टोकियो ऑलिम्पिकमध्ये खेळणार नाही. रविवारी तिने ही माहिती दिली. तथापि, तिने यासाठी कोणतेही कारण दिले नाही. २३ वेळच्या ग्रँडस्लॅम चॅम्पियनने म्हटले आहे की ती टोकियो ऑलिम्पिकसाठी अमेरिकन संघाचा भाग नसेल. विम्बल्डनच्या अवघ्या एक दिवस आधी ३९ वर्षीय या स्टार खेळाडूने माध्यमांशी बोलताना सांगितले की, “हो, मी खरोखर ऑलिम्पिकच्या यादीत नाही. मला याबाबत माहित नाही असे नाही. मी टोकियोमध्ये खेळतांना दिसणार नाही, हे खरे आहे. ऑलिम्पिकसंदर्भात माझ्या निर्णयामागे बरीच कारणे आहेत. मला खरोखर तिथे जायचे नाही. मी दिलगीर आहे.”
येत्या २३ जुलैपासून टोकियो ऑलिम्पिकला सुरुवात होणार आहे. राफेल नदाल आणि डोमिनिक थिमसारख्या इतर टेनिसपटूंनी देखील ते जपानला जाणार नसल्याचे सांगितले आहे. रॉजर फेडररने शनिवारी सांगितले की त्याने अद्याप टोकियो ऑलिम्पिकमध्ये सहभाग घेण्याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही. विम्बल्डनमध्ये कशा प्रकारे कामगिरी होते यावर तो निर्णय अवलंबून असेल, असे फेडररने स्पष्ट केले आहे.
सेरेना विल्यम्सने आत्तापर्यंत ३३ ग्रँडस्लॅममध्ये भाग घेतला आहे. यात तिने आत्तापर्यंत २३ ग्रँडस्लॅम जिंकले आहेत. ज्यामध्ये ७ ऑस्ट्रेलियन ओपन, ७ विम्बल्डन, ३ फ्रेंच ओपन आणि ६ अमेरिकन ओपन विजेतेपदांचा समावेश आहे. जागतिक क्रमवारीत ती सध्या आठव्या स्थानावर आहे.
महत्वाच्या बातम्या:
“जर देव प्रतिसाद देत नसेल तर…” पृथ्वी शॉने कसून सराव करतानाचा व्हिडिओ शेअर करत दिले हटके कॅप्शन
“तुझा बाप ही करेल हे काम”, माजी प्रशिक्षक युनिस खानने या वेगवान गोलंदाजाला केली होती शिवीगाळ