---Advertisement---

अरे वा! ४५ वर्षात भारताविरुद्ध असं पहिल्यांदाच घडलंय, इंग्लिश गोलंदाजांचा अनोखा कारनामा

On: रविवार, मार्च 28, 2021 8:15 PM
---Advertisement---

पुणे येथे भारत आणि इंग्लंड संघातील वनडे मालिकेचा तिसरा सामना खेळला जात आहे. या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकत भारताला प्रथम फलंदाजी करण्याचे आमंत्रण दिले होते. भारतीय संघाने याचा फायदा घेत ४८.२ षटकात ३२९ धावांचा डोंगर उभा करत इंग्लंडला ३३० धावांचे आव्हान दिले आहे. भारताच्या डावात इंग्लंडच्या गोलंदाजांकडून एक अनोखी कामगिरी पाहायला मिळाली.

इंग्लंडच्या गोलंदाजांची आगळी कामगिरी
अखेरच्या निर्णायक सामन्यात भारतीय संघासाठी रोहित शर्मा व शिखर धवन यांनी शतकी सलामी दिली. परंतु, १५७ धावांपर्यंत जाता जाता भारतीय संघाचे ४ गडी बाद झाले. रिषभ पंत व हार्दिक पंड्या यांनी अर्धशतके ठोकून भारताला सर्वबाद ३२९ पर्यंत मजल मारून दिली.

इंग्लंडच्या गोलंदाजांनी भारताचे सर्वगडी बाद करताना एक आगळीवेगळी कामगिरी केली. इंग्लंडच्या कर्णधाराने या सामन्यात सात गोलंदाजांचा वापर केला. विशेष म्हणजे, या सर्वांनी कमीत कमी एक बळी मिळविला. इंग्लंडसाठी सर्वाधिक ३ बळी वेगवान गोलंदाज मार्क वूडने टिपले. लेग स्पिनर आदिल रशीदने दोन बळी आपल्या नावे केले. सॅम करन, मोईन अली, रिस टोप्ली, लियाम लिव्हींगस्टोन व बेन स्टोक्स यांनी प्रत्येकी एक बळी मिळवला.

४५ वर्ष जुन्या विक्रमाची बरोबरी
इंग्लंडच्या गोलंदाजांनी अशी कामगिरी करत ४५ वर्षांपूर्वीच्या न्यूझीलंडच्या गोलंदाजांच्या विक्रमाची बरोबरी केली. १९७६ मध्ये न्यूझीलंड दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघाला ऑकलंड वनडेत दारुण पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यावेळी न्यूझीलंडकडून आठ गोलंदाजांनी गोलंदाजी केली होती. त्यातील सात गोलंदाजांना बळी मिळविण्यात यश आलेले.

महत्त्वाच्या बातम्या –

‘गब्बर’ने घेतला स्टोक्सचा अफलातून झेल, पंड्याने जोडले हात, पाहा व्हिडिओ

जोस बटलरच्या अप्रतिम एकहाती झेलाने रोखले रिषभ पंतचे वादळ, पाहा व्हिडिओ

हे भारीय! रिषभ पंत आऊट होऊ नये म्हणून इंग्लंडचाच माजी खेळाडू करत होता प्रार्थना

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---