इंग्लंडमधील बर्मिंघम येथे २०२२ मध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत. या राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये जवळपास २४ वर्षानंतर महिला क्रिकेट खेळले जाईल. आता या स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या ७ संघांची नावे समोर आली आहेत. विशेष म्हणजे यावेळी यामध्ये कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तानचे संघ असल्याने राष्ट्रकुल स्पर्धेत देखील आता क्रिकेटचे महायुद्ध रंगणार आहे. ही स्पर्धा टी२० स्वरूपात खेळली जाईल.
राष्ट्रकुल स्पर्धेत खेळणार हे संघ
पुढील वर्षी जून-जुलै महिन्यात इंग्लंड येथील बर्मिंघम शहरात राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा खेळल्या जाणार आहे. इतर सर्व राष्ट्रकुल खेळांसह यावर्षी तब्बल २४ वर्षानंतर राष्ट्रकुलमध्ये क्रिकेटचा समावेश केला आहे. यापूर्वी अखेरच्या वेळी १९९८ मध्ये मलेशियातील क्वाललंपूर येथे खेळल्या गेलेल्या राष्ट्रकुलमध्ये पुरुषांची स्पर्धा खेळली गेली होती.
बर्मिंघम येथे होणाऱ्या या स्पर्धेसाठी भारत, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडीज, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका व पाकिस्तान या देशांच्या महिला क्रिकेट संघांनी पात्रता मिळवली आहेत. उर्वरित एका जागेसाठी पात्रता फेरी खेळवली जाईल. या पात्रता फेरीत बांगलादेश व श्रीलंका हे प्रमुख संघ खेळताना दिसतील.
Teams that have qualified for the Birmingham 2022 Commonwealth Games ????#B2022 pic.twitter.com/sYJqUJPHxl
— ICC (@ICC) April 26, 2021
चुरशीची होऊ शकते स्पर्धा
ही संपूर्ण स्पर्धा बर्मिंघम येथील एजबॅस्टन क्रिकेट मैदानावर होईल. या स्पर्धेसाठी यजमान इंग्लंड व ऑस्ट्रेलियाच्या संघांना विजेतेपदाची प्रबळ दावेदार म्हणता येईल. मात्र, भारत व न्यूझीलंडकडून त्यांना तगडी लढत मिळू शकते. वेस्टइंडीज व दक्षिण आफ्रिकेचे संघ चांगली कामगिरी करू शकतात. भारतीय संघाचा विचार केल्यास हरमनप्रीत कौर, स्मृती मंधना, शेफाली वर्मा व जेमिमा रॉड्रिग्ज यांच्यावर फलंदाजीची भिस्त राहील. तर, पूनम यादव, राधा यादव व शिखा पांडे गोलंदाजीची जबाबदारी सांभाळतील.
महत्त्वाच्या बातम्या –
दुसर्या संघांकडून आता लोनवर खेळाडू घेणार राजस्थानचा संघ, वाचा कोणत्या नियमाचा होणार फायदा
भारतीय ड्रेसिंग रूममध्ये ‘या’ नावाने जडेजाला मारली जाते हाक, खुद्द शास्त्री गुरूजींनी केला उलगडा
आरसीबीविरूद्ध फलंदाजीला धोनीच्या आधी का आला जडेजा? खुद्द कर्णधारानेच केला उलगडा






