कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादूर्भावामुळे भारतातील सर्वात मोठी टी20 स्पर्धा समजली जाणारी आयपीएल लीग 15 एप्रिल पर्यंत रद्द करण्यात आली आहे. शनिवारी (14 मार्च) आयपीएल फ्रँचायझी असलेल्या कोलकाता नाईट रायडर्सचा मालक आणि बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानने कोरोना व्हायरसबद्दल आपले मत व्यक्त केले आहे.
यावेळी कोरोनाबद्दल बोलताना शाहरुख (Shahrukh Khan) म्हणाला की, आशा करतो की कोविड-19 (कोरोना व्हायरस) च्या प्रकरणाला कुठेतरी ब्रेक लागेल. तसेच आयपीएल स्पर्धेबाबत आवश्यक असलेल्या आरोग्याच्या दक्षतेसह निर्णय घेतला
बीसीसीआयने (BCCI) 29 मार्चला सुरु होणारी आयपीएल स्पर्धा 15 एप्रिलपर्यंत स्थगित केली आहे. या निर्णयानंतर मुंबईत शनिवारी आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलची बैठक (IPL Governing Council Meeting) होण्यापूर्वी फ्रँचायझी मालकांनी एकमेकांची भेट घेतली.
“मैदानाबाहेरच्या सर्व फ्रँचाइजी मालकांना भेटून आनंद झाला. बीसीसीआय आणि आयपीएल दरम्यानच्या बैठकीतही त्याच गोष्टीचा पुनरुच्चार करण्यात आला. कारण आपल्या सर्वांना असे वाटते की, आपण ज्या शहरांमध्ये खेळत आहोत तेथील प्रेक्षक, खेळाडू, व्यवस्थापन आणि सुरक्षा ही सर्वात महत्त्वाची आहे. आरोग्य संस्था आणि सरकारच्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे पालन केले जाईल,” असे खानने आपल्या ट्वीटमध्ये सांगितले.
यावेळी खान म्हणाला की, “अपेक्षा करतो की, या कोरोना व्हायरसचा प्रादूर्भाव कमी होईल. जेणेकरून आयपीएल स्पर्धेला सुरुवात करता येईल. बीसीसीआय आणि संघ मालकांनी सरकारच्या संपर्कात राहतील. तसेच प्रत्येकाचे आरोग्य लक्षात घेत निर्णय घेतले जातील. सर्वांना भेटून आनंद झाला आणि पुन्हा पुन्हा हाथ स्वच्छ केले.”
खरं तर जगभरातील 1.25 लाख लोकांना या कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. तर 5 हजार लोकांना या व्हायरसमुळे जीव गमवावा लागला आहे. भारतात या व्हायरसमुळे 80हून अधिक लोकांना लागण झाली आहे. तर 2 लोकांनी आपला जीव गमावला आहे.
ट्रेंडिंग घडामोडी-
– रिचर्डसन पाठोपाठ हा क्रिकेटपटूही सुटला कोरोनाच्या कचाट्यातून…
– जडेजाच्या जादूटोण्यामुळे रणजी ट्रॉफी फायनलमध्ये बंगालचा झाला पराभव?…
– कोरोना इफेक्ट: कॅप्टन कोहलीचा चाहत्यांना खास संदेश