टीम इंडियाच्या एका माजी फिरकीपटूनं नुकतीच निवृत्ती जाहीर केली. त्यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व फॉरमटला अलविदा केला आहे. भारतीय फिरकी गोलंदाज शाहबाज नदीमनं भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पाचव्या आणि शेवटच्या सामन्यापूर्वी निवृत्ती जाहीर केली.
नदीम (shahbaz nadeem) म्हणाला की, “मी क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. या गोष्टीचा मी बराच काळ विचार करत होतो.” नदीम म्हणाला की त्याला आता यापुढे कदाचित भारतीय संघात स्थान मिळणार नाही. त्यामुळे युवा खेळाडूंना संधी देण्यासाठी त्यानं हा निर्णय घेतला. मात्र नदीमची भविष्यात जगातील विविध टी-२० लीग मध्ये खेळण्याची योजना आहे.
34 वर्षीय शाहबाज नदीमनं भारतासाठी 2019 ते 2021 दरम्यान 2 कसोटी सामने खेळले. त्यानं ऑक्टोबर 2019 मध्ये रांची येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी पदार्पण केलं होतं. यानंतर त्यानं फेब्रुवारी २०२१ मध्ये चेन्नई येथे इंग्लंडविरुद्ध दुसरा आणि करियरचा शेवटचा कसोटी सामना खेळला. या दोन कसोटी सामन्यांच्या 4 डावात गोलंदाजी करताना नदीमनं 34.12 च्या सरासरीनं 8 विकेट्स घेतल्या आहेत, ज्यामध्ये 4/40 ही त्याची सर्वोत्तम कामगिरी होती.
शाहबाज नदीम झारखंडकडून प्रथम श्रेणी क्रिकेट खेळायचा. त्यानं डिसेंबर 2004 मध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. विशेष म्हणजे नदीम बिहार अंडर-14 संघ आणि भारतीय अंडर-19 संघांसाठीही खेळला आहे. सध्या तो आयपीएलमध्ये लखनौ सुपर जायंट्सकडून खेळतो.
नदीमनं आपल्या कारकिर्दीत एकूण 140 प्रथम श्रेणी सामने खेळले, ज्यामध्ये त्याच्या नावे 542 विकेट्स आहेत. या दरम्यान ७/४५ ही त्याची सर्वोत्तम कामगिरी होती. गोलंदाजीसह नदीमनं फलंदाजीतही आपली उपयोगिता सिद्ध केली आहे. त्यानं 191 डावात फलंदाजी करताना 15.29 च्या सरासरीनं 2784 धावा केल्या. या काळात त्यानं 2 शतकं आणि 8 अर्धशतकं झळकावली आहेत. २०२२-२३ रणजी हंगामात त्यानं राजस्थानविरुद्ध शेवटचा प्रथम श्रेणी सामना खेळला.
महत्त्वाच्या बातम्या –
IND vs ENG । ‘सर्वात मोठे दुःख हेच की…’, धरमशाला कसोटीआधी अश्विनने व्यक्त केली खंत
‘तो पावरप्ले आणि डेथ ओवर्समध्ये गोलंदाजी करत नाही…’, कमिन्स हैदराबादचा कर्णधार बनताच प्रश्न उपस्थित