वनडे विश्वचषक 2023 मध्ये 35 वा सामना न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान खेळला जात आहे. बेंगलोरच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर होत असलेल्या सामन्यात न्यूझीलंडच्या फलंदाजांनी प्रथम फलंदाजी करताना 401 धावा उभारल्या. न्यूझीलंड संघासाठी युवा रचिन रवींद्र याने शतक तर कर्णधार केन विलियम्सन याने 95 धावांची वेगवान खेळी केली. या सामन्यात पाकिस्तानचे वेगवान गोलंदाज अत्यंत महागडे ठरले. यासोबतच त्यांच्या नावे एक लाजिरवाणा विक्रमही जमा झाला.
या सामन्यात न्यूझीलंडच्या फलंदाजांनी सुरुवातीपासूनच आक्रमक रूप धारण केले होते. सलामीवीरांनी 68 धावांची भागीदारी केली. त्यानंतर रचिन रवींद्र (108) व केन विलियम्सन (95) यांनी 180 धावांची भागीदारी केली. त्यानंतर इतर फलंदाजांनी देखील धावांचा वेग कमी न होऊ देता संघाला 401 पर्यंत पोहोचवले.
या सामन्यात पाकिस्तानचा सर्वात प्रमुख वेगवान गोलंदाज असलेला शाहीन आफ्रिदी सर्वात महागडा ठरला. त्याच्या दहा षटकात तब्बल 90 धावा वसूल केल्या गेल्या. पाकिस्तानकडून वनडे विश्वचषक इतिहासात केली गेलेली ही सर्वात महागडी गोलंदाजी आहे. तर त्याचाच सहकारी असलेल्या हारिस रौफ याने देखील 85 धावा लुटवल्या. ही पाकिस्तानकडून वनडे विश्वचषक इतिहासातील दुसरी सर्वात महागडी गोलंदाजी ठरली. याच विश्वचषकात रौफ याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 84 धावा दिल्या होत्या.
संघाचा तिसरा वेगवान गोलंदाज हसन अली याने देखील आपल्या गोलंदाजीवर 82 धावा बहाल केल्या. तर, चौथा वेगवान गोलंदाज मोहम्मद वसीम याने किफायतशीर गोलंदाजी करत दहा षटकात 60 धावा विरोधी संघाला दिल्या. याचाच अर्थ पाकिस्तानच्या चारही वेगवान गोलंदाजांनी मिळून आपल्या 40 षटकात तब्बल 316 धावांचे आंदण दिले.
(Shaheen Afridi And Harris Rauf Bowl Most Expensive Spells In World Cup History For Pakistan)
बातम्या
AUSvENG: प्रतिष्ठेच्या सामन्यात इंग्लंडचा गोलंदाजीचा निर्णय, अशी आहे दोन्ही प्लेईंग इलेव्हन
पाकिस्तानवर भारी पडला रचिन! झळकावले विश्वचषकातील तिसरे शतक, 23 व्या वर्षीच…