---Advertisement---

आता विरोधकांची खैर नाही! विश्वचषकापूर्वी शाहीन आफ्रिदीने पुन्हा मिळवली फिटनेस, वाचा सविस्तर

On: शनिवार, ऑक्टोबर 8, 2022 12:55 AM
shaheen
---Advertisement---

पाकिस्तान क्रिकेट संघासाठी एक चांगली बातमी समोर आली आहे. आगामी टी-20 विश्वचषक अवघ्या काही दिवसांवर आला आहे, अशात त्यांच्या संघासाठी ही बातमी खरोखर खूपच चांगली आणि महत्वाची ठरते. वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिती दुखापतीमुळे मागच्या महिन्यात महत्वाच्या सामन्यांमध्ये खेळू शकला नव्हता, पण आता तो या दुखापतीतून पूर्णपणे सावरला आहे. अशात टी-20 विश्वचषकात देखील तो संघासाठी खेळताना दिसणार आहे. 

पाकिस्तानला टी-20 विश्वचषक 2022 मधील अभियानाची सुरुवात 23 सप्टेंबरपासून करायची आहे. मालिकेतील पहिला सामना कट्टर प्रतिस्पर्धी भारतासोबत खेळायचा असून शाहीन आफ्रिकी (Shaheen Afridi) या सामन्यात महत्वाची भूमिका बजावू शकतो. आफ्रिदी संघात पुनरागमन करणार असल्यामुळे भारतीय संघाची चिंता वाढू शकते. मागच्या वर्षी टी-20 विश्वचषकात त्याने भारतीय संघातील महत्वाच्या फलंदाजांच्या तंबूचा रस्ता दाखवला होता. आता दुखापतीतून सावरल्यानंतर तो पुन्हा एकदा भारतीय फलंदाजांचा घाम काढू शकतो, याची शक्यता नाकारता येणार नाही.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष रमीज राजा (Ramiz Raja) यांनी स्वतः शाहीन आफ्रिदीच्या फिटनेसची माहिती दिली.  रमीजने सांगितल्याप्रमाणे 23 ऑक्टोबरला मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर होणाऱ्या भारताविरुद्धच्या सामन्यात खेळण्यासाठी आफ्रिदी उपलब्ध असणार आहे. तत्पूर्वी आफ्रिदी इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत आणि आशिया चषक स्पर्धेत खेळला नव्हता. असे असले तरी, आगामी टी-20 विश्वचषकात तो इतर सर्व संघांसाठी चिंतेची बाब बनू शकतो.

आफ्रिदी जरी पूर्णपणे बरा झाला असला, तरी पाकिस्तान संघाचा महत्वाचा खेळाडू उस्मान कादिर याला दुखापत झाली आहे. रमीज राजाने पाकिस्तानातील एका माध्यमाशी बोलताना याविषयी माहिती दिली. त्यांनी सांगितले की, “उस्मान कादिरला दुखापत झाली आहे. त्याच्या बोटाला हेयर लाइन फ्रँक्चर झाले आहे. आम्ही पाहू यावर आमच्याकडे काय उपाय आहेत. फकर जमानची फिटनेसही सुधारत आहे. मला वाटते ही गोष्ट खूप महत्वाची असेल.”

दरम्यान, शाहीन आफ्रिदीला जुलै महिन्यात गॉलमध्ये श्रीलंकेविरुद्ध पहिला कसोटी सामना खेळताना ही दुखापत झाली होती. नंतर असे समोर आले की ही दुखापत जास्तच गंभीर आहे आणि यातून सावरण्यासाठी त्याला मोठा वेळ लागू शकतो.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
‘हा तर भारतीय जर्सीतील शोएब मलिक…’, एमएस धोनीचा मेणबत्तीचा पुतळा पाहून चाहत्यांची सटकली
बुमराहनंतर आता दीपक चाहरलाही झाली दुखापत, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतून बाहेर होणार? 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---