इंग्लंड आणि भारत यांच्यात मागच्या वर्षीच्या कसोटी मालिकेतील राहिलेला शेवटचा सामना सध्या खेळला जात आहे. १ जुलैपासून हा सामना बर्मिंघममध्ये सुरू झाला. माजी कर्णधार विराट कोहली या सामन्यातील पहिल्या डावात देखील अपयशी ठरला. विराटकडून चाहत्यांना मोठ्या खेळीची अपेक्षा होती, पण तसे झाले नाही. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज मॅथ्यू पॉट्सने त्याला त्रिफळाचीत केले, परंतु पाकिस्तानी वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीशी विराटच्या या विकेटचा संबंध जोडला जात आहे.
विराटने इंग्लंडविरुद्धच्या या पाचव्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात ११ धावा करून विकेट गमावली. या धावा करण्यासाठी त्याने २५ चेंडू खेळले आणि २ चौकार देखील मारले. मॅथ्यू पॉट्स (Matthew Potts) पहिल्या डावाच्या २५ व्या षटकात गोलंदाजीसाठी आला होता. षटकातील दुसऱ्या चेंडू त्याने ऑफ स्टंपच्या बाहेर टाकला. विराट सुरुवातीला हा चेंडू खेळण्याच्या विचारात होता, पण नंतर ऐन वेळी त्याने चेंडू सोडण्याचा प्रयत्न केला. चेंडू सोडण्यासाठी विराटने बॅट वर करेपर्यंत चेंडू बॅटला लागून स्टंप्समध्ये घुसला. दरम्यान, ही पहिली वेळ नाहीये, जेव्हा विराटने अशा प्रकारे विकेट गमावली असेल. मागच्या अनेक महिन्यांपासून विराट अशा पद्धतीने बाद होत आला आहे.
EDGBASTON GOES POTTY! 🎉
Scorecard/Videos: https://t.co/jKoipF4U01
🏴 #ENGvIND 🇮🇳 pic.twitter.com/X5G3B2HsRU
— England Cricket (@englandcricket) July 1, 2022
परंतु उभय संघातील मॅथ्यू पॅट्सने विराट कोहली (Virat Kohli) बाद केल्यामुळे त्याची खास चर्चा होत आहे. पॉट्स यावर्षी पाकिस्तान सुपर लीगमध्ये लाहोर कलंदर्ससाठी खेळला होता. त्यावेळी शाहीन आफ्रिदी (Shaheen Afridi) आणि पॉट्स एकत्र पाहिले गेले होते. शाहीकडून पॉट्सने गोलंदाजीचे काही खास सल्ले घेतल्याचे सांगितले जात आहे. चाहत्यांच्या मते याच सल्लांच्या मदतीने पॉट्स विराटला बाद करू शकला आहे. शाहीन आणि पॉट्सचा एकत्रित फोटो सध्या पाहिला जात आहे.
दरम्यान, या सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर भारतीय संघाने पहिल्या डावात ४१६ धावा करून सर्व विकेट्स गमावल्या. यामध्ये रिषभ पंतने १४६ आणि रवींद्र जडेजाने १०४ धावांचे सर्वाधिक योगदान दिले. तर दुसऱ्या बाजूला इंग्लंडसाठी त्यांचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने ६० धावा खर्च करून ५ विकेट्स घेतल्या.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
रिषभ पंतच्या शतकानंतर इंग्लंडच्या माजी कर्णधाराचे वादग्रस्त ट्वीट, पाहा चाहते का भडकले
आनंदाला उधाण! बुमराहच्या बेधुंद फटकेबाजीचा डगआऊटमध्ये जोरदार जल्लोष, प्रशिक्षकांची रिऍक्शन लक्षवेधी
Video: जडेजाने शतक ठोकताच विराटही झाला भलताच खूष, रिऍक्शन पाहून तुम्हीही कराल प्रशंसा