---Advertisement---

बुमराहच्या विक्रमाला पडणार खिंडार? आफ्रिदीचा होणारा जावई पोहचलाय अगदी जवळ

On: रविवार, जुलै 17, 2022 9:57 AM
Jasprit Bumrah & Shaheen Afridi
---Advertisement---

पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात झाली आहे. या मालिकेतील पहिला सामना गॅले येथील गॅले इंटरनॅशनल स्टेडियमवर खेळला जात आहे. येथे यजमान संघाचा कर्णधार दिमुथ करुणारत्नेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्यांचा हा निर्णय फारसा योग्य ठरला नाही. यजमान संघ पहिल्याच दिवशी २२२ धावांवर गारद झाला. श्रीलंकेच्या या बिकट परिस्थितीत पाकिस्तानचा २२ वर्षीय युवा स्टार वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीचा महत्त्वाचा हात होता. ग्रीन आर्मीसाठी १४.१ षटके टाकताना त्याला एकूण ४ गडी बाद केले. पहिल्या डावात आफ्रिदीचा बळी घेतलेल्या खेळाडूंमध्ये कर्णधार दिमुथ करुणारत्ने, धनंजय डी सिल्वा, यष्टिरक्षक निरोशन डिकवेला आणि महेश टीक्षाना यांचा समावेश होता.

आफ्रिदी बुमराहच्या जवळ आला.
आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२१-२०२३ मध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत आफ्रिदी भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या अगदी जवळ आला आहे. खरं तर, बुमराहने या मोसमात आतापर्यंत १० सामने खेळले असून, १९ डावात १९.७३च्या सरासरीने ४५ बळी घेतले आहेत. त्याचबरोबर आफ्रिदीच्या नावावर ४१ विकेट्सही झाल्या आहेत. यादरम्यान त्याने १४ डावांमध्ये आठ सामने खेळले आहेत.

आफ्रिदीने अब्दुर रहमानच्या विक्रमाशी बरोबरी केली.
पाकिस्तानी स्टारने कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेण्याच्या बाबतीत आपला देशबांधव माजी खेळाडू अब्दुर रहमानची बरोबरी केली आहे. खरेतर, रहमानने २००७ ते २०१४ दरम्यान पाकिस्तान संघासाठी कसोटी क्रिकेटमध्ये २२ सामने खेळले आणि ४३ डावांमध्ये २९.३९ च्या सरासरीने ९९ बळी घेतले. त्याचबरोबर आफ्रिदीच्या नावावर श्रीलंकेविरुद्ध चार विकेट्स घेत कसोटी क्रिकेटमध्ये ९९ बळीही जमा झाले आहेत. आफ्रिदीला ही विकेट २५* सामन्याच्या ४१ डावात मिळाली आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

बांग्लादेशने वेस्ट इंडिजला दिलाय क्लीन स्विप, ‘या’ खेळाडूने वेधले जगाचे लक्ष

हुश्श! अखेर तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात कोहलीला ‘विराट’ खेळ करण्याची संधी, वाचा इतिहास

प्रसिद्ध आऊट, लॉर्ड इन?, तिसऱ्या सामन्यात टीम इंडियामध्ये होणार महत्वाचे बदल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---