जम्मू- काश्मीरचा राहणारा उमरान मलिक इंडियन प्रीमियर लीगमधील त्याच्या प्रदर्शनानंतर चर्चेत आला आहे. आता त्याला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मायदेशातील मालिकेसाठी भारतीय संघात देखील निवडले गेले आहे. उमरान मलिकने आयपीएल २०२२ हंगामात विक्रमी ताशी १५७ किमी गतीने चेंडू टाकला, पण तो हंगामात सर्वात वेगवान चेंडू मात्र ठरू शकला नाही. त्याच्या याच प्रदर्शानासाठी जगभरातील दिग्गज कौतुक करत आहेत, पण पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीने मात्र त्याच्या गोलंदाजीतील कमी दाखवून दिली आहे.
उमरान मलिक (Umaran Malik) आयपीएल २०२२मध्ये सनरायझर्स हैदराबादचे प्रतिनिधित्व करत होता. त्याने एका सामन्यात १५७ किमी ताशी गतीने चेंडू टाकला, जो संगामातील सर्वात वेगवान चेंडू होता. मात्र, हंगामाच्या अंतिम सामन्यात लॉकी फर्ग्यूसनने तब्बल १५७.३ किमी ताशी गतीने चेंडू टाकला आणि उमरानचा विक्रम मोडीत पाडला. उमरानला जरी या हंगामातील सर्वात वेगवान चेंडू टाकता आला नसला, तरी त्याचे प्रदर्शन पाहून भारतीय संघाच्या निवडकर्त्यांनी त्याला आगामी मालिकेसाठी निवडले आहे.
शाहीन शाह आफ्रिदी (Shaheen Shah Afridi) सध्या पाकिस्तान संघाचा सर्वात महत्वाचा गोलंदाज आहे. शाहीनच्या जोरावर पाकिस्तान संघाने अनेक महत्वाचे सामने जिंकले आहेत. भविष्यात उमरान देखील भारतीय संघासाठी शाहीनसारखे किंवा त्यापेक्षा चांगले प्रदर्शन करू शकतो, असे अनेकांना वाटत आहे. परंतु शाहीन आफ्रिदीला मात्र उमरानच्या प्रदर्शाविषयी शंका आहे. पत्रकार परिषदेत शाहीन आफ्रिदीला जेव्हा उमरानविषयी विचारले गेले, तेव्हा तो म्हणाला की, “फक्त गतीमुळे काहीच होत नाही. तुमच्याकडे लाईन आणि लेंथ देखील पाहिजे.”
पाकिस्तान संघाला ८ जूनपासून वेस्ट इंडिजविरुद्ध तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळायची आहे. या मालिकेपूर्वी शाहीन आफ्रिदीने ही प्रतिक्रिया दिली आहे. भारतीय संघाला देखील दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ९ जूनपासून टी-२० मालिका खेळायची आहे. पाच सामन्यांची ही मालिका १९ जूनला संपेल. उमरान मलिकला या मालिकेसाठी जरी भारतीय संघात निवडले गेले असले, त्याला पदार्पणाची संधी मिळेलच याची अद्याप कसलीही खात्री देता येणार नाही.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
रोहितच्या बालपणीच्या प्रशिक्षकांचा विराटला पाठिंबा; म्हणाले, ‘गावसकर अन् रिचर्ड्सप्रमाणे कोहलीही…’
‘…तरीही कोहली फेल असल्यासारखे वाटते’, भारताच्या माजी कर्णधाराचे मोठे विधान