पाकिस्तानचे माजी दिग्गज क्रिकेट कर्णधार शाहिद आफ्रिदी यांच्या मुलीच्या लग्नाची बातमी मागील काही काळापासून पाकिस्तान क्रिकेटमध्ये चर्चेत आहे. यामागचे एक मोठे कारण म्हणजे आफ्रिदी यांच्या मुलीचे लग्न पाकिस्तानच्या वर्तमान क्रिकेट संघातील स्टार वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीशी होणार असल्याची चर्चा होती. शाहिद आफ्रिदी प्रमाणेच शाहीनची देखील पाकिस्तानमध्ये प्रचंड लोकप्रियता आल्यामुळे या दोन्ही दिग्गजांच्या कुटुंबातील नात्याच्या या चर्चेला मोठे उधाण आले होते.
विशेष म्हणजे यापूर्वीच शाहीनच्या कुटूंबातील सदस्यांनी वृत्ताला दुजोरा दिला होता. आता स्वतः शाहिद आफ्रिदी यांनी देखील या वृत्ताची पुष्टी केली आहे.
शाहिद आफ्रिदी यांनी आता स्वत: या संपूर्ण प्रकरणावरील मौन सोडले आहे. त्यांनी स्पष्ट केले की आपली मुलगी अक्सा आणि पाकिस्ताचा स्टार गोलंदाज शाहीन यांचा विवाह होणार आहे.अक्सा ही शाहिद आफ्रिदी यांची सर्वात मोठी मुलगी आहे. या दोघांच्या लग्नाची बातमी जेव्हा पहिल्यांदाच पसरली होती, तेव्हा असं म्हटलं जातं होत की, अक्साचे शिक्षण अजूनही सुरू आहे. त्यामुळे लग्नाला 2 वर्षांचा कालावधी लागू शकतो.
शाहिद आफ्रिदी यांनी म्हटले आहे की, या लग्नाच्या बातम्या येण्यापूर्वी त्यांची मुलगी आणि शाहीन यांच्यात कोणतेही संबंध नव्हते. जिओ टीव्हीवर बोलताना शाहिद आफ्रिदी म्हणाले की आफ्रिदींच्या 8 वेगवेगळ्या जमाती असतात. मी आणि शाहीन वेगवेगळ्या जमातीचे आहेत.
मात्र जेव्हा शाहिद आफ्रिदीला लग्नाच्या तारखांबद्दल विचारले गेले तेव्हा त्यांनी याबाबत थेट उत्तर दिले नाही. ते म्हणाले की, शाहीन आणि अक्सा या दोघांचेही लक्ष सध्या त्यांच्या कारकीर्दीवर आहे. शाहिद यांनी सांगितले की, आपल्या मुलीला डॉक्टर बनायचे आहे. आता तिला हे ठरवावे लागेल की पाकिस्तानमध्ये शिक्षण घ्यायचे की इंग्लंडमध्ये.
शाहिद आफ्रिदी आणि शाहीन शाह आफ्रिदी हे सासरे आणि जावई होणार आहेत, पण पाकिस्तान सुपर लीगमध्ये ते अनेकवेळा एकमेकांविरूद्ध खेळलेले आहेत. शाहीन शाह आफ्रिदी लाहोर कलंदरकडून खेळत असून, शाहिद आफ्रिदी मुलतान सुलतान संघाचे सदस्य आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
जेव्हा ब्रेट लीची गोलंदाजी खेळतांना आकाश चोप्राला फुटला होता घाम, पाहा व्हिडिओ
दीपिका पदुकोण ते किम शर्मा! ‘या’ बॉलीवूड अभिनेत्रींसह होते युवराजचे अफेअर
असला कसला अंपायर? गोलंदाजाला आणले रडकुंडीला, पाहा मजेदार व्हिडिओ