---Advertisement---

पाकिस्तानच्या शाहिद आफ्रिदीने विरोधी गोलंदाजाला मारली बॅट, कॅमेरात कैद झाली होती पूर्ण घटना

---Advertisement---

क्रिकेटला सभ्य लोकांचा खेळ असे म्हटले जाते. परंतु बऱ्याचदा क्रिकेटपटू मैदानावर अशा काही कृती करतात, ज्यामुळे क्रिकेटची नाचक्की होते. त्यातही पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंचे नाव यासाठी कुप्रसिद्ध आहे. वसिम अकरम, वकार युनिस वा शाहिद आफ्रिदी (Shahid Afridi), अशा बऱ्याच पाकिस्तानी क्रिकेटपटूंवर त्यांच्या कृत्यामुळे टीका झाली आहे. एकदा असेच त्याने २०१६ मध्ये रागारागात विरोधी संघाच्या गोलंदाजाच्या डोक्यावर बॅट मारली (Shahid Afridi Hit Bilwal Bhatti With Bat) होती. पाकिस्तान सुपर लीग (Pakistan Super League) मधील पेशावर जाल्मीकडून कराची किंग्जविरुद्ध खेळताना त्याने ही नकोशी कृती केली होती. 

पेशावर जाल्मी विरुद्ध कराची किंग्ज यांच्यातील सामन्यादरम्यान आफ्रिदीने मुद्दाम वेगवान गोलंदाज बिलावल भट्टी (Bilwal Bhatti) ला बॅट मारली होती.

काय होता तो किस्सा?
पाकिस्तान सुपर लीगमधील या सामन्यात पेशावर जाल्मी संघाला १५३ धावा करायच्या होत्या. ११.३ षटकांपर्यंत त्यांचा संघ ३ विकेट्स ६९ धावा अशा स्थितीत होता. पेशावर जाल्मी संघाकडून फलंदाजीसाठी अष्टपैलू आफ्रिदी मैदानावर होता. यावेळी डावातील १२ वे षटक टाकण्यासाठी बिलावल भट्टी आला होता. त्याच्या षटकातील चौथ्या चेंडूवर आफ्रिदी पायचित झाला होता, यावर गोलंदाज बिलावलने पंचांकडे पाहात त्यांच्याकडे जोरदार अपील करत मागच्या दिशेने पळत होता आणि दुसरीकडे आफ्रिदी धाव घेण्यासाठी पळत होता. परिणामी आफ्रिदी आणि बिलावलची धडक होऊ शकली असती.

परंतु आफ्रिदीने मात्र बिलावल आपल्यापुढे येत असल्याचे पाहून त्याला जोराने बॅट मारली आणि धक्का दिला. त्यानंतर तो त्याची माफी मागण्यासाठी त्याच्याजवळही गेला. बॅट मारल्यानंतर मैदानावर कोसळलेला बिलावल काही वेळ सदम्यात दिसला. परंतु नंतर तो उठून गोलंदाजीस सज्ज झाला. इतका ड्रामा केल्यानंतर अखेर पंचांनी आफ्रिदीला बादच दिले. हे पाहून आफ्रिदी थोडा हताशही झाल्याचे दिसले.

https://youtu.be/9NbxPnzHNCA

आफ्रिदीने संघ सहकाऱ्याशीही केला होता विवाद
इतकेच नव्हे तर, आफ्रिदीने त्याच्या संघ सहकाऱ्यांसोबतही विवाद केला होता. त्याच्यामध्ये आणि शोएब अख्तरमध्ये मोठे भांडण झाले होते. या भांडणात अख्तरने आफ्रिदीला बॅट मारण्याचा प्रयत्न केला होता. परंतु तो खाली वाकल्यामुळे बॅट मोहम्मद आसिफला लागली होती.

महत्त्वाच्या बातम्या-

अखेर दिवंगत फिरकीपटू शेन वॉर्नचे पार्थिव मेलबर्नमध्ये दाखल, मार्चअंती होणार अनंतात विलिन

आयपीएल इतिहासात प्रथमच असणार ऑरेंज कॅप-पर्पल कॅपसाठी स्पॉन्सर! ‘या’ कंपनीशी झाला करार

दिल्ली कॅपिटल्सला आणखी एक धक्का! वॉर्नर सुरुवातीच्या पाच सामन्यांतून बाहेर

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---