मंगळावीर (18 ऑक्टोबर) भारतीय क्रिकेट नियमक मंडळ म्हणजेच बीसीसीआयची नवीन कार्यकारिणी नियुक्त केली गेली. जय शहा पुन्हा एकदा बीसीसीआयचे सचिव झाले आणि पदभार स्वीकारल्यानंतर लगेच त्यांनी एक मोठी घोषणा केली. शहांनी सांगितल्याप्रमाणे भारतीय संघ पुढच्या वर्षी आशिया चषक खेळण्यासाठी पाकिस्तान दौरा करणार नाहीये. शहांच्या या विधानानंतर पाकिस्तान क्रिकेटमध्ये खळबळ उडाली आहे. पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी यानेही याविषयी नाराजी व्यक्त केली आहे. आफ्रिदीच्या मते भारत आणि पाकिस्तान संघांतील संबंध सुधारत असताना शहांनी हे विधान केले आहे.
शाहिद आफ्रिदी (Shahid Afridi) पाकिस्तान क्रिकेट संघाच्या दिग्गज कर्णधारांपैकी एक आहे. आफ्रिदीच्या मते मागच्या काही वर्षांमध्ये आधीच्या तुलनेत भारत आणि पाकिस्तान या दोन कट्टर प्रतिस्पर्धी संघांमधील संबंध सुधारले आहेत. पण अशातच आता बीसीसीआयचे सचिव जय शहा (Jay Shah) यांनी अशा पद्धतीचे विधान दिले, ज्यामुळे संबंध पुन्हा खराब होऊ शकतात. दरम्यान, भारत आणि पाकिस्तान संघ मागच्या वर्षी टी-20 विश्वचषकात आमने सामने आले होते. या विश्वचषका सामन्यात भारताला 10 विकेट्सने पराभव स्वीकारावा लागाल होता, पण दोन्ही देशांतील खेळाडूंमध्ये मैत्रीपूर्ण संबंध पाहायला मिळाले होते. त्यानंतर उभय संघांमध्ये आशिया चषक 2022 मध्येही आमना सामना झाला आणि याठिकाणीही खेळाडूंमध्ये खेळीमेळीचेच वातावरण दिसले.
परंतु शहिद आफ्रिदीच्या मते जय शहांनी जे विधान केले आहे, असा विधानांमुळे खेळाडूंमधील आणि परिणामी दोन्ही देशांतील संबंध पुन्हा खराब होण्यास सुरुवात होऊ सकते. आफ्रिदीने स्वतःच्या अधिकृत ट्वीटर खात्यावरून एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “मागच्या 12 महिन्यात दोन्ही देशांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध बनले आहेत. दोन्ही देशांसाठी हे चांगले संबंध बनवले गेले आहे. अशात टी-20 विश्वचषक सामन्याच्या पूर्वसंध्येला हे विधान का दिले? यावरून भारतीय क्रिकेट संघटनेतील अनुभवाची कमी दिसून येते.”
When excellent comradery between the 2 sides in the past 12 months has been established that has created good feel-good factor in the 2 countries, why BCCI Secy will make this statement on the eve of #T20WorldCup match? Reflects lack of cricket administration experience in India
— Shahid Afridi (@SAfridiOfficial) October 18, 2022
दरम्यान, टी-20 विश्वचषक 2022 चा पहिला सामना 16 ऑक्टोबर रोजी खेळला गेला होता. भारतीय संघ विश्वचषक अभियानाची सुरुवात 23 ऑक्टोबर रोजी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याने करेल.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
व्हिडिओ: आफ्रिदीच्या घातक वेगवान यॉर्करने फलंदाज जखमी, सहकाऱ्याच्या पाठीवर बसून गेला मैदानाबाहेर
दुख, दर्द, पीडा! विश्वचषक खेळण्यासाठी सोडली मोठी ऑफर, पाकिस्तान संघातूनही सानियाचा पती बाहेर