पाकिस्तान संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू शाहदी आफ्रिदी याने पाकिस्तान संघाच्या विजयात अनेकदा मोलाची भूमिका बजावली आहे. त्याने काही वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला राम राम ठोकले होते. परंतु, तो जगातील इतर टी-२० लीग स्पर्धेत खेळताना दिसून येत असतो. नुकत्याच पार पडलेल्या पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेत तो खेळणार होता, परंतु स्पर्धा सुरु होण्यापूर्वीच सराव शिबिरात तो गंभीर दुखापतग्रस्त झाला होता, ज्यामुळे त्याला या स्पर्धेतून माघार घ्यावी लागली होती. दरम्यान, त्याने आपल्या आवडत्या ८ क्रिकेटपटूंची नावे सांगितली आहेत.
शाहिद आफ्रिदीने जगभरातील ८ क्रिकेटपटूंची निवड केली आहे. त्याला बीस्पोर्ट्सच्या एका कार्यक्रमात एक प्रश्न विचारण्यात आला होता की, तुमच्या आवडत्या खेळाडूंची नावं सांगा. त्यावेळी शाहिद आफ्रिदीने ८ नावं सांगितली.(shahid afridi picks virat kohli in his favourite players list)
इंजमाम आणि अनवर पासून केली सुरुवात
शाहीद आफ्रिदीने आपल्या आवडत्या खेळाडूंचे नावं सांगायला इंजमाम-उल-हक आणि सईद अनवर यांच्यापासून सुरुवात केली. त्यानंतर त्याने उर्वरित नावे सांगितली. त्याने म्हटले की, ‘जर मी माझ्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळाबद्दल बोलू तर मला इंजमाम आणि अनवर यांचा खेळ खूप आवडायचा. त्यांना टीव्हीवर खेळताना पाहून मला आनंद व्हायचा. मी नशीबवान आहे की, माझे त्यांच्यासोबत खेळण्याचे स्वप्न देखील पूर्ण झाले.’
यादीत ४ पाकिस्तानी तर एकमेव भारतीय खेळाडूचा समावेश
शाहिद आफ्रिदीने मॉडर्न डे क्रिकेटमधून बाबर आजम आणि फखर जमान यांचे नाव घेतले आहे. त्याने म्हटले की, ‘दोघेही उत्कृष्ट खेळाडू आहेत. हे पाकिस्तान संघाला चांगली सुरुवात करून देण्याचा क्षमता ठेवतात. सध्याच्या क्रिकेटपटूंपैकी मला त्यांचा खेळ खूप आवडतो.’
तसेच त्याने पुढे एकमेव भारतीय खेळाडूचे घेतले. तो खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून विराट कोहली आहे. आफ्रिदीने विराटाचे तोंडभरून कौतुक देखील केले. तसेच आवडत्या अन्य परेदेशी खेळाडूंबाबत बोलताना त्याने ब्रायन लारा, ग्लेन मॅग्रा, आणि एबी डीविलियर्स यांचे नावं घेतली.
महत्वाच्या बातम्या-
‘मी लोकांना खूश करण्यासाठी खेळत नाही,’ कर्णधार मितालीची टिकाकारांना सणसणीत चपराक