---Advertisement---

केवळ एक भारतीय खेळाडूला घेऊन आफ्रिदीने तयार केली ड्रीम ११

On: शुक्रवार, एप्रिल 10, 2020 7:14 PM
---Advertisement---

कोरोना व्हायरसमुळे सर्वच स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत. असे असले तरीही मागील काही दिवसांमध्ये अनेक क्रिकेटपटूंनी आपला आवडता संघ अर्थात ड्रीम ११ घोषित करत आहेत. असा एक संघ पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीनेही निवडला आहे.

आफ्रिदीला नुकतेच आपला सर्वकालीन ११ जणांचा संघ निवडण्यास सांगितले होते. त्यावेळी त्याने आपल्या संघात अनेक मोठ-मोठ्या दिग्गज खेळाडूंचा समावेश केला आहे. विशेष म्हणजे त्याने निवडलेल्या ११ जणांच्या संघात केवळ एका भारतीय खेळाडूचा समावेश आहे.

आफ्रिदीने आपल्या संघात पाकिस्तानचे दिग्गज फलंदाज सईद अनवर (Saeed Anwar) यांना सलामीवीर फलंदाज म्हणून निवड केली आहे. यावेळी आफ्रिदीने अनवर यांच्या आक्रमक खेळीची प्रशंसादेखील केली आहे. तर त्याने अनवर यांचा जोडीदार म्हणून ऑस्ट्रेलियाचे दिग्गज यष्टीरक्षक फलंदाज अॅडम गिलख्रिस्ट (Adam Gilchrist) यांना निवडले आहे.

याबरोबरच आफ्रिदीने ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज कर्णधार रिकी पाँटिंग (Ricky Ponting) आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला (Sachin Tendulkar) अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी निवडले आहे. या खेळाडूंबद्दल बोलताना आफ्रिदी म्हणाला की, दिग्गज या क्रमांकावर आहेत.

या संघात पाचव्या क्रमांकावर इंजमाम उल हकची (Inzamam Ul Haq) निवड केली आहे. तर अष्टपैलू क्रिकेटपटू म्हणून जॅक कॅलिस (Jacques Kallis) यांना निवडले आहे.

यष्टीरक्षक म्हणून आफ्रिदीने पाकिस्तानचे राशिद लतीफ (Rashid Latif) यांची निवड केली आहे.

याव्यतिरिक्त गोलंदाजांमध्ये वसीम अकरम (Wasim Akram), ग्लेन मॅकग्रा (Glenn McGrath) यांना निवडले आहे. तर शेन वॉर्न (Shane Warne) आणि  शोएब अख्तर (Shoaib Akhtar) या वेगवान गोलंदाजांचीही निवड करण्यात आली आहे.

आपल्या सर्वकालीन अकरा जणांच्या या संघात निवडलेल्या अनेक खेळाडूंबरोबर किंवा त्यांच्याविरुद्ध आफ्रिदी खेळला आहे. विशेष म्हणजे त्याने भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि ऑस्ट्रेलियाचा फलंदाज स्टिव्ह स्मिथ (Steve Smith) यांसारख्या नव्या काळातील कोणत्याही खेळाडूला या संघात स्थान दिलेले नाही.

आफ्रिदीची गणना जगातील स्फोटक फलंदाजांमध्ये केली जाते. तसेच वनडे क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर जलद शतकाचाही विक्रम अनेक वर्ष होता. त्याने ३९८ वनडे सामन्यांतील ३६९ डावात ३५१ षटकार ठोकल्या आहेत.

असा आहेशाहिद आफ्रिदीचा सर्वकालीन ११ जणांचा संघ-

सईद अनवर, अॅडम गिलख्रिस्ट, रिकी पाँटिंग, सचिन तेंडुलकर, इंजमाम उल हक, जॅक कॅलिस, राशिद लतीफ (यष्टीरक्षक), वसीम अकरम, शेन वॉर्न, ग्लेन मॅकग्रा आणि शोएब अख्तर.

ट्रेंडिंग घडामोडी-

-मुंबईकरांसाठी २४ तास काम करणाऱ्या पोलीसांचं भारताच्या या क्रिकेटपटूकडून जोरदार कौतूक

-विराट कोहलीवरुन आता टीम पेन- मायकेल क्लार्कमध्ये खडाजंगी

-कार घेऊन भारतीय क्रिकेटपटू थेट बाजारात, पोलीसांनी फाडलं चलन

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---