कोरोना व्हायरसविरुद्ध लढा देण्यासाठी भारतात लॉकडाऊन आणि काही भागांमध्ये कर्फ्यू लावण्यात आला आहे. जेणेकरून नागरिक घरातून बाहेर निघणार नाही. परंतु चक्क भारतीय संघाचा अष्टपैलू क्रिकेटपटू रुषी धवन हा आपली कार थेट बाजारात घेऊन गेला. त्यामुळे पोलिसांनी त्याला ५०० रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.
यावेळी तो कर्फ्यू विश्रांती (Curfew Relaxation) दरम्यान बाहेर आला होता. परंतु नियमानुसार, यावेळी त्याच्याकडे वाहनांचा पास देखील नव्हता.
एका वृत्तानुसार धवनकडे (Rishi Dhawan) पास नसल्यामुळे त्याला मंडी (Mandi) येथील गांधी चौकमध्ये दंड आकारण्यात आला. जेव्हा तेथून जात असताना, पोलिसांनी त्याची विचारपूस केली. ज्यामध्ये समजले की, त्याच्याकडे वाहन घेऊन जाण्यासाठी पास नव्हता. खरं तर जिल्हा प्रशासनाने कर्फ्यूमुक्त दरम्यानही वाहनांच्या प्रवेशावर बंदी घातली आहे. यादरम्यान केवळ अतिआवश्यक वाहनांना येण्या-जाण्यासाठी परवानगी दिली आहे.
पोलिसांनी ५०० रुपयांचा दंड (500 Rupees Penalty) आकारल्यानंतर धवनने त्याचवेळी हा दंड भरला. विशेष म्हणजे धवनने कोरोना व्हायरसच्याविरुद्धच्या लढाईत मदत म्हणून १ लाख रुपये दिले होते.
धवनने भारतीय संघासाठी ३ वनडे आणि १ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने वनडेत १२ आणि टी२०त १ धावा केल्या आहेत. तर वनडेत आणि टी२०त प्रत्येकी १ विकेट्स घेतल्या आहेत.
याव्यतिरिक्त त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ७९ सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने ३७०२ धावा केल्या आहेत. त्यात ४ शतके आणि ३० अर्धशतकांचा समावेश आहे. याबरोबरच त्याने ३०८ विकेट्स घेतल्या आहेत.
ट्रेंडिंग घडामोडी-
-रमीज राजा व शोएब मलिकमध्ये ट्विटरवर जोरदार भांडणं
-इंग्लंडमध्ये इंग्लंडला धोबीपछाड देणार ३ महान भारतीय कर्णधार
-कोरोना बाधितांसाठी तब्बल १० कोटी रुपये देणारा आयपीएलमधील एकमेव संघ






