---Advertisement---

हिंदू धर्मीयांच्या मदतीला शाहिद आफ्रिदी मंदिरात, मिळाले आशिर्वाद

On: गुरूवार, मे 14, 2020 4:55 PM
---Advertisement---

पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी मागील ३ महिन्यांपासून कोरोना व्हायरसमुळे बाधित लोकांची मदत करत आहे. पाकिस्तानमध्ये या व्हायरसचा प्रसार झाल्यापासून त्याने गरिबांंच्या मदतीसाठी हातभार लावला आहे.

आफ्रिदीची (Shahid Afridi) फाऊंडेशन (संस्था) मागासलेल्या भागात जाऊन लोकांना रेशन व आवश्यक वस्तू उपलब्ध करून देत आहे. इतकेच नव्हे तर त्याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये तो हिंदू लोकांची मदत करताना दिसत आहे. आफ्रिदीने मंदिरात जाऊन गरीब लोकांना राशनदेखील वाटले आहे.

आफ्रिदीने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तो लक्ष्मीनारायण मंदिरात गेल्याचे दिसते. तिथे त्याने हिंदू लोकांची मदत केली. आफ्रिदीबरोबर पाकिस्तानचा खेळाडू जहांगीर खानही उपस्थित आहे.

https://twitter.com/SAfridiOfficial/status/1259461825860702208

पाकिस्तानच्या सिंध प्रांतातही आफ्रिदीची फाऊंडेशन लोकांची मदत करत आहे. येथील ५४ टक्के लोक हिंदू आहेत.

आफ्रिदीने नुकताच एक व्हिडिओ ट्विटरवरून पोस्ट केला होता. ज्यामध्ये त्याने घोषणा केली होती की तो सर्व ब्रँड्ससाठी मोफत जाहिरात करेल. त्यांनी त्याला केवळ रेशन आणि आवश्यक वस्तूंची मदत करावी.

या व्हायरसच्या परिस्थितीत इतर खेळाडू घरात बसून आपला वेळ घालवत आहेत. तर आफ्रिदी घराबाहेर पडून लोकांची मदत करत आहे.

ट्रेंडिंग घडामोडी-

-तुम्हाला सांगू शकत नाही अशा गोष्टी आम्हाला विराट बोलायचा

-एक खाणकामगाराचा मुलगा ते भारतीय संघातील प्रमुख गोलंदाज

-अतिशय गरीबीतुन पुढे आलेले ५ भारतीय क्रिकेटपटू, आज आहेत करोडपती

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---