पाकिस्तान क्रिकेट बोर्डचे अध्यक्ष नजम सेठी यांनी बाबर आझम याच्याविषयी मोठा खुलासा केला आहे. रमीज राजा यांनी पीसीबी अध्यक्षपद सोडल्यानंतर सेठी पुन्हा एकदा ही जबाबदारी पार पाडत आहेत. 2023 च्या सुरुवातील शाहिद आफ्रिदी याच्या नेतृत्वात पीसीबीने क्रिकेट संघासाठी प्रभारी निवड समिती तयार केली होती. सेठींच्या माहितीनुसार या समिताची अध्यक्षर शाहिद आफ्रिदी बाबर आझमकडून पाकिस्तानचे कर्णधारपद काढून घेऊ ईच्छित होता.
शाहिद आफ्रिदी (Shahid Afridi) पाकिस्तान क्रिकेट संघाचा दिग्गज अष्टपैलू आणि माजी कर्णधार राहिला आहे. यावर्षीच्या सुरुवातील शाहिद आफ्रिदीच्या नेतृत्वात पीसीबीने प्रभारी निवड समिती तयार केली होती. निवड समितीचा अध्यक्ष बनल्यानंतर शाहिन बाबर आझम (Babar Azam) याच्याकडून पाकिस्तानचे कर्णधारपद काढून घेणार होता. स्वतः पीसीबीचे अध्यक्ष नजम सेठी यांनी याविषीय सविस्तर माहिती दिली. निवड समितीत अब्दुल रज्जाक, इफ्तिखार अंजुम आणि हारून रशिद देखील होते.
एका युट्यूब चॅनलवर नजम सेठी म्हणाले, “मी वारंवार सांगितले आहे की, कर्णधार बनदलण्यासारखे निर्णय मी घेत नाही. ज्यांच्यावर मी विश्वास ठेवतो, त्यांन मी सल्ले देत असतो. जेव्हा मी पीसीबीची जबाबदारी स्वीकारली, तेव्हा आम्ही एक प्रभारी निवड समिती तयार केली होती. जेव्हा निवडकर्त्यांनी आपली जबाबदारी स्वीकारली, तेव्हाच ते म्हणाले होते की, त्यांना संघात बदल हवे आहेत. यामध्ये बाबर आजमला कर्णधारपदातून मुक्त करणे हादेखील निर्णय घेतला जाणार होता.”
पण शाहिद आफ्रिदीने जबाबदारी स्वीकालल्यानंतर कर्णधार बदलण्याची गरज नाही, असा निर्णय घेतला. मुलाखतीत सेठींनीच याविषयी माहिती दिली. दरम्यान, वर्षाच्या सुरुवातील पाकिस्तानने मायदेशातील न्यूझीलंडविरुद्धची मालिका खेळल्यानंतर आफ्रिदीने प्रमुख निवडकर्त्यांची जबाबदारी सोडली. त्याच्याकडे सर्व बैठकिंना उपस्थित राहण्यासाठी वेळ नाही, असे कारण शाहिद आफ्रिदीने हे पद सोडताना दिसे होते. आफ्रिदीनंतर हारून राशिदला पाकिस्तानचा प्रमुख निवडकर्ता म्हणून नियुक्त केले गेले. (Shahid Afridi Vs Babar Azam! The PCB president made a big revelation about the captaincy)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
रिंकूने दाखवली खिलाडूवृत्ती! 5 षटकार ठोकल्यानंतर त्या गोलंदाजाला केला मेसेज, म्हणाला…
मिचेल मार्शच्या आयुष्यातील सर्वात खास दिवस, प्रेयसी ग्रेटा मॅकसोबत अडकला लग्नबंधनात, पाहा फोटो