पाकिस्तानचा माजी दिग्गज कर्णधार शाहिद आफ्रिदी नेहमीच चर्चेत असतो. भारतीय क्रिकेटविषयी देखील आफ्रिदीने अनेकदा प्रतिक्रिया दिल्या आहेत. भारताचा दिग्गज फलंदाज आणि माजी कर्णधार विराट कोहली आशिया चषक 2022 मध्ये त्याच्या जुन्या फॉर्ममध्ये परतल्याचे दिसले. असे असले तरी आफ्रिदीने विराटला एक असा सल्ला दिला आहे, ज्यामुळे सर्वच आश्चर्य व्यक्त करत आहेत. तसेच अनेकजण त्याच्यावर टीका देखील करत आहेत.
विराटने निवृत्ती घ्यावी – शाहिद आफ्रिदी
शाहिद आफ्रिदी (Shahid Afridi) एका पाकिस्तानी माध्यमावर बोलत असताना त्याने विराट कोहली (Virat Kohli) विषयी हे मोठे विधान केले. तो म्हणाला की, “विराट ज्या पद्धतीने खेळला, त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला नाव बनवण्यासाठी संघर्ष देखील केला. तो एक चॅम्पियन आहे आणि मला वाटते की, एक वेळ अशी येते, जेव्हा तुम्ही निवृत्तीच्या दिशेने चालले असता. तुमचे लक्ष्य यशाच्या शिखरावार असताना निवृत्ती घेण्याचे असले पाहिजे. अशी वेळ येऊ दिलीच नाही पाहिजे, जेव्हा तुम्हाला संघातून बाहेर बसवले जाईल.”
“जेव्हा तुम्ही स्वतःच्या खेळात सर्वोत्तम प्रदर्शन करत असता, तेव्हाच तुम्ही हा निर्णय घेतला पाहिजे. परंतु असे खूप कमी होते. खूप कमी खेळाडू, खासकरून आशियामध्ये खूपच कमी क्रिकेटपटू असा निर्णय घेतात. परंतु मला असे वाटते जेव्हा विराट हा निर्णय घेईल, तो अगदी स्टाईलमध्ये घेईल. शक्यतो त्याच पद्धतीने ज्या पद्धतीने त्याने स्वतःच्या कारकिर्दीची सुरुवात केली होती,” असे आफ्रिदी पुढे बोलताना म्हणाला.
दरम्यान, विराट नुकत्याच पार पडलेल्या आशिया चषक स्पर्धेत चांगल्या फॉर्ममध्ये दिसला. आशिया चषक सुरू होण्यापूर्वी विराट साधारण एक महिन्याच्या विश्रांतीवर होता. विश्रांतीनंतर जेव्हा तो मैदानात परतला, तेव्हा एका नव्या जोमात खेळताना दिसला. चाहते मागच्या मोठ्या काळापासून त्याला अशा फॉर्ममध्ये पाहण्यासाठी इच्छुक होते. त्याने तब्बल दोन वर्ष आणि 10 महिन्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक केले. त्याने हाँगकाँगविरुद्धच्या सामन्यात 61 चेंडूत 200 च्या स्ट्राईक रेटने 122 धावांची वादळी खेळी केली आणि अखेर त्याच्या 71 व्या शतकाचा प्रतिक्षा संपला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
विनेशची आणखी एक विशेष कामगिरी! जागतिक कुस्ती स्पर्धेत जिंकले विक्रमी ब्रॉंझ
जय शाह होणार नवे बीसीसीआय अध्यक्ष?
दिग्गजांचे द्वंद्व हुकले! पावसाच्या व्यत्ययाने इंडिया लिजेंड्स विरूद्ध वेस्ट इंडिज लिजेंड्स सामना रद्द