---Advertisement---

आयपीएलच्या एकाही संघाने पसंती न दाखवलेल्या शाय होपने केला मोठा पराक्रम…

On: रविवार, डिसेंबर 22, 2019 7:53 PM
---Advertisement---

यष्टीरक्षक फलंदाज शाय होपने कटकच्या बाराबती क्रिकेट स्टेडियमवर भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील तिसर्‍या आणि निर्णायक वनडे सामन्यात उत्कृष्ट कामगिरी करत एक नवीन विक्रम आपल्या नावावर केला आहे.

या सामन्यात शाय होपने 50 चेंडूत 42 धावा केल्या. याबरोबरच त्याने वनडे कारकिर्दीत 3000 वनडे धावा पूर्ण केल्या. त्याने 67 व्या वनडे डावात खेळताना हा विक्रम केला आहे. त्यामुळे तो वनडेमध्ये सर्वात जलद 3000 धावा पूर्ण करणारा दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज ठरला आहे. 

विंडीजच्या विव्हियन रिचर्ड्ससह त्याने अनेक दिग्गजांना मागे टाकत हा विक्रम केला आहे. 

वनडेमध्ये सर्वात जलद 3000 धावा करण्याचा विक्रम सध्या दक्षिण आफ्रिकेचा माजी फलंदाज हशिम अमलाच्या नावावर आहे. त्याने 3000 वनडे धावा पूर्ण करण्यासाठी 57 डावांचा सामना केला होता. आता त्याच्यापाठोपाठ शाय होपने स्थान मिळवले आहे. या यादीत पाकिस्तानचा बाबर आझम तिसर्‍या क्रमांकावर आहे. त्याने 68 डावात 3000 वनडे धावा पूर्ण केल्या आहेत.

होपला आज मोहम्मद शमीने त्रिफळाचीत करत बाद केले. या सामन्यात वेस्ट इंडिजने निकोलस पूरन आणि कायरन पोलार्ड यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर 50 षटकात 5 बाद 315 धावा करत भारतासमोर विजयासाठी 316 धावांचे आव्हान ठेवले आहे.

वनडेमध्ये सर्वात जलद 3000 धावा करणारे फलंदाज –

57 डाव – हाशिम अमला

67 डाव – शाय होप

68 डाव – बाबर आझम

69 डाव – व्हिव रिचर्ड्स

72 डाव – गॅरि कर्स्टन, शिखर धवन, जो रुट, गोर्डन ग्रिनिज

73 डाव – केन विलियम्सन

74 डाव – क्विंटॉन डिकॉक

75 डाव – विराट कोहली

https://twitter.com/Maha_Sports/status/1208689145637289984

https://twitter.com/Maha_Sports/status/1208713130961817600

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---