सध्या वेस्ट इंडिजमध्ये आयसीसी १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेचा (icc under 19 world cup) थरार सुरू आहे. ही स्पर्धा सध्या शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे. बुधवारी (२ फेब्रुवारी) या स्पर्धेतील उपांत्य फेरीतील सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया (india vs australia) या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने ९६ धावांनी विजय मिळवत अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. या सामन्यात कर्णधार यश धूलने (Yash dhull) शतकी खेळी केली होती. तर संघाचा उपकर्णधार शेख राशिदने (Shaikh Rasheed) महत्वपूर्ण ९४ धावांची खेळी केली. शेख राशिदच्या संघर्षाची कहाणी अनेकांना माहीत नसेल.
शेख राशिद हा आंध्रप्रदेशच्या गुंटुरमध्ये राहतो. शेख राशिदला एक क्रिकेटपटू म्हणून जगासमोर आणण्यात त्याच्या वडिलांनी मोलाची भूमिका बजावली आहे. त्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी आपल्या नोकरीचा देखील त्याग केला होता. त्याला फलंदाजीचा सराव करता यावा यासाठी त्यांनी आपली बँकेची नोकरी सोडून दिली होती. एका मुलाखतीत त्यांनी खुलासा केला होता की, राशिद एक दिवस नक्की भारतीय संघासाठी खेळणार हे त्यांना माहीत होते, त्यामुळे त्यांनी नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला होता.
वडिलांनी सोडली होती बँकेची नोकरी
शेख राशिदचे वडील शेख बालिशा यांनी म्हटले की, “मी एका खाजगी बँकेत काम करायचो. मला आढळले की, त्याला फलंदाजीचा सराव करण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे मी नोकरी सोडून दिली. आमचा घर खर्च बचत केलेल्या पैशातून सुरू होता. ”
शेख बालिशा यांनी सांगितले की, शेख राशिदची आंध्रप्रदेशच्या १४ वर्षाखालील आणि १६ वर्षाखालील संघात निवड झाली होती. परंतु, या दोन्ही स्पर्धांमध्ये तो चांगली कामगिरी करू शकला नव्हता. ज्यामुळे तो डिप्रेशनमध्ये गेला होता. त्याने क्रिकेट सोडण्याची तयारी सुरू केली होती. परंतु, वडिलांनी समजूत काढल्यानंतर त्याने पुन्हा एकदा तयारी सुरू केली आणि आंध्रप्रदेशच्या संघात स्थान मिळवले. त्यानंतर त्याने चांगली कामगिरी केली आणि त्याची निवड भारताच्या १९ वर्षाखालील संघात झाली.
महत्वाच्या बातम्या :
भारतीय संघात कोरोनाचा स्फोट? वेस्ट इंडिज मालिकेपूर्वीच ‘हे’ दिग्गज खेळाडू बाधित
जिथे आयुष्याला डाग लागला, तिथेच तो डाग मिटवायला येतोय परत!! लिलावातील संधीवरून श्रीसंत भावुक
यष्टीरक्षकांच्या शोधात आहेत फ्रँचायझी, ईशान किशनसह ‘या’ विकेटकिपर्सची लिलावात होणार चांदी!