---Advertisement---

हद्दच केली! पायात चप्पल घालून शाकिब अल हसन खेळपट्टीवर, पंचांसोबत वाद घातल्यानंतर मोठी कारवाई

On: बुधवार, जानेवारी 11, 2023 5:36 PM
Shakib Al Hasan
---Advertisement---

सध्या सुरू असलेल्या बांगलादेश प्रीमियर लीग स्पर्धेत 7व्या सामन्यात चाहत्यांना चांगलाच वाद पाहायला मिळाला. शाकिब अल हसन याच्या नेतृत्वातीला फॉर्च्यून बरिशाल आणि रंगपूर रायडर्स यांच्यातील हा सामना मिरपूरच्या शेर ए बांगला स्टेडियवर खेळला गेला. शाकिबच्या संघाने सामन्यात विजय मिळवला, पण शाकिबला मैदानात वाद घातल्यामुळे आर्थिक नुकसान सोसावे लागले.

बांगलादेश संघाचा कर्णधार शाकिब अल हसन (Shakib Al Hasan) नेहमीच क्रिकेटच्या मैदानात वाद घालताना दिसला आहे. बांगलादेश प्रीमियर लीगच्या चालू हंगामात देखील शाकिब लाईव्ह सामन्यात वाद घालताना दिसला. चालू हंगामातील एका सामन्यात त्याने वाईड चेंडूच्या मुद्यावरून पंचांसी भिडला होता. मंगळवारी (10 जानेवारी) फॉर्च्यून बरिशाल आणि रंगपूर रायडर्स यांच्यातील सामन्यात शाकिब पुन्हा एकदा मैदानात दादागिरी करताना दिसला. शाकिब यावेळी डकआउटमधून चप्पल घालून बाहेर आला आणि नंतर थेट खेळपट्टीपर्यंत पोहोचला. यादरम्यान पंचांसोबत त्याचा पुन्हा एकदा वाद झाल्याचेही पाहायला मिळाले.

शाकिबच्या नेतृत्वातील फॉर्च्यून बरिशाल संघ फलंदाजी करत असताना हा प्रकार घडला. शाकिबच्या संघासाठी डावाची सुरुवात अनामुल हक (Anamul Haque) आणि चतुरंगा डी सिल्वा (Chaturanga de Silva) यांनी केली. हे दोन्ही फलंदाज खेळपट्टीवर आल्यानंतर स्ट्राईकवर कोण खेळणार, याचा निर्णय घेणे त्यांच्यासाठी कठीण होता. डावखुरा वेगवान गोलंदाज रकिबुल हसन पहिल्या षटकात गोलंदाजीसाठी तयार होत होता. अशात फॉर्च्यून संघाचा डावखुरा फलंदाज डी सिल्वा स्ट्राईकवर खेळण्यासाठी गेला. पण डी सिल्वाला स्ट्राईकवर पाहताच उजव्या हाताने गोलंदाजी करणारा फिरकीपटू मेहदी सहन याच्याकडे चेंडू दिला गेला.

रंगपूर रायडर्सन संघाने ही चाल चालल्यानंतर फॉर्च्यून संघआनेही दिरंगाई न करता स्ट्राईकवरील फलंदाज बदलला. डी सिल्बा नॉन स्ट्राईकला पोहोचला, तर अनामुल हक स्ट्राईकवर पोहोचला. फॉर्च्यून संघाच्या फलंदाजांना स्ट्राईक रोटेट केल्याचे पाहून रंगपूरने पहिला चेंडू टाकला जाण्याआधी गोलंदाज पुन्हा बदलला आणि यावेळी रकिबुल गोलंदाजीसाठी पुढे आला. हा सर्व प्रकार पाहून शाकिब अल हसन (Shakib Al Hasan) चांगलाच संतापल्याचे पाहायला मिळाले. तो स्वतःचा संयम गमावून बसला आणि सीमारेषेच्या बाहेरून बोलता-बोलता तो मैदानात आला. मैदानात येताना त्याने पायात चप्पल घातली असल्यामुळे चाहत्यांसाठी हे दृष्ट नवीन होते.

https://twitter.com/FanCode/status/1612758941104214016?s=20&t=NXBoz5Agp1Qty_8voEaFmQ

शाहीक डगआउटमधून खेळपट्टीपर्यंत चालत आल्यानंतर पंचांनी त्याला पुन्हा मैदानाबाहेर जाण्याचे आवाहन केले. पण शाकिब मात्र पंचांना न जुमानता त्यांच्याशीच वाद घालू लागला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल होत आहे. प्रकरण सांत झाल्यानंतर मात्र शाकिबने मैदान सोडले. या प्रकणानंतर शाकीब आणि नुरल हसन या दोन्ही संघांच्या कर्णधारांवर बांगलादेश क्रिकेट बोर्डाने 15% सामना शुक्ल कापण्याची कारवाई केली. (Shakib Al Hasan arrives on the pitch wearing slippers, major action taken after argument with umpires)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
लायन शंतनु सिध्दा यांच्या स्मरणार्थ लायन्स प्रौढ टी-20 क्रिकेट स्पर्धेत गार्गी एज्युकॉन अँड स्मार्ट टेक संघांची विजयी सलामी
21व्या गुरू तेगबहादुर गोल्ड कप फुटबॉल स्पर्धेत अमर एफसी, फातिमा इलेव्हन संघांचा उप-उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश  

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---