शाकिब अल हसन (Shakib Al Hasan) हा टी२० क्रिकेटमधील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूंपैकी एक आहे. टी२० आंतरराष्ट्रीय आणि टी२० लीग स्पर्धांमध्ये त्याने अनेक मोठ मोठे विक्रम आपल्या नावावर केले आहेत. सध्या तो बांगलादेश प्रीमियर लीग (Bangladesh premier league) स्पर्धा खेळण्यात व्यस्त आहे. या स्पर्धेत त्याने टी२० क्रिकेटमधील एका मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे.
शाकिब अल हसनने सोमवारी (२४ जानेवारी) फॉर्च्यून बरीशल संघाकडून खेळताना मिनिस्टर ग्रुप ढाकाविरुद्ध विशेष कामगिरी केली. त्याने या सामन्यात महमूदुल्लाह रियादला (Mahmudullah Riyad) बाद करताच तो टी२० क्रिकेटमध्ये ४०० गडी बाद करणारा ५ वा गोलंदाज ठरला आहे. इतकेच नव्हे तर तो टी२० क्रिकेटमध्ये ४०० गडी बाद करणारा डाव्या हाताचा पहिलाच गोलंदाज ठरला आहे.
शाकिब अल हसनने जगभरातील अनेक टी२० लीग स्पर्धेचे प्रतिनिधित्व केले आहे. तसेच त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर, ९४ टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये १९.८ च्या सरासरीने ११७ गडी बाद केले आहेत. सध्या तो टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक गडी बाद करणारा गोलंदाज आहे. तसेच तो आयसीसी अष्टपैलू गोलंदाजाच्या यादीत तो सर्वोच्च स्थानी आहे.
टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक गडी बाद करण्याचा विक्रम सध्या वेस्ट इंडिजचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्रावोच्या नावावर आहे. त्याने जगातील अनेक प्रतिष्ठित लीग स्पर्धांमध्ये खेळत ५५४ गडी बाद केले आहेत. ड्वेन ब्रावोनंतर या यादीत दुसऱ्या स्थानी दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज फिरकीपटू इम्रान ताहीर आहे. त्याने आतापर्यंत टी२० क्रिकेटमध्ये एकूण ४३५ गडी बाद केले आहेत.
तसेच तिसऱ्या क्रमांकावर कॅरेबियन फिरकीपटू सुनील नरेन आणि चौथ्या क्रमांकावर अफगाणिस्तानचा फिरकी गोलंदाज राशिद खान आहे. सुनील नरेनने आतापर्यंत टी२० क्रिकेटमध्ये ४२५ आणि अफगाणिस्तानचा फिरकी गोलंदाज राशिद खानने ४२० गडी बाद केले आहेत.
महत्वाच्या बातम्या :
नामकरण झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी लखनऊ संघाला मोठा धक्का! संघातील प्रमुख सदस्याला कोरोनाची लागण
हे नक्की पाहा:






