---Advertisement---

ऑक्टोबरच्या ‘प्लेअर ऑफ द मंथ’ पुरस्कारासाठी ‘या’ खेळाडूंना नामांकन, एकाही भारतीयाचा मात्र समावेश नाही

On: गुरूवार, नोव्हेंबर 4, 2021 10:47 PM
---Advertisement---

टी२० विश्वचषकाचा थरार आता मध्यात पोहचला आहे. विविध संघांच्या विविध खेळाडूंनी आपआपली कौशल्य या स्पर्धेत दाखवली आहेत. त्याचीच नोंद घेत आयसीसीने ऑक्टोबर महिन्यातील उत्कृष्ट खेळाडूंची (प्लेअर ऑफ द मंथ) नामांकन जाहीर केली आहे. या यादीत तीन खेळाडूंची नावे नोंदली गेली आहे. यात नामीबिया, पाकिस्तान आणि बांगलादेशच्या खेळाडूंनी हा सन्मान मिळवला आहे. विशेष बाब म्हणजे यात एकाही भारतीय खेळाडूला स्थान मिळवता आलेले नाही.

पाकिस्तानचा आक्रमक फलंदाज आसिफ अली, बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू शकीब अल हसन आणि नामिबियाचा डेविड विसे यांना ऑक्टोबरसाठीचा आयसीसी सर्वोत्तम पुरूष खेळाडू म्हणून नामांकन मिळाले आहे.

ऑक्टोबरसाठी आयसीसी महिन्यातील उत्कृष्ट खेळाडू या पुरस्कारासाठी आयर्लंडची अष्टपैलू लॉरा डेलानी आणि फलंदाज गॅरी लुईससह झिम्बाब्वेची कर्णधार आणि अष्टपैलू मेरी-अ‍ॅन मुसोंडा यांना नामांकन मिळाले आहे.

न्यूझीलंड आणि अफगाणिस्तानविरुद्धच्या विजयात पाकिस्तानच्या आसिफ अलीने महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्याने न्यूझीलंडविरुद्ध १२ चेंडूत २७ धावा केल्या आणि पुढच्या सामन्यात अफगाणिस्तान संघाविरुद्ध १९ व्या षटकात ४ षटकार ठोकले होते.

शकीब अल असनने गेल्या महिन्यात सहा टी-२० सामने खेळले ज्यात त्याने १०९.१६ च्या स्ट्राईक रेटने १३१ धावा केल्या आणि ११ बळीही घेतले आहेत. नामिबियाच्या डेविड विसेने ८ टी-२० सामन्यात १६२ धावा केल्या आणि ७ विकेट घेतल्या. त्याच्या चमकदार कामगिरीच्या जोरावर नामिबियाने सुपर १२ मध्ये स्थान मिळवले होते.

आयसीसी कडून प्रत्येक महिन्याला उत्कृष्ट खेळाडूंची यादी जाहीर केली जाते. वर्षभरातील आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व प्रकारातील सर्वोत्तम कामगिरी दाद तसेच वाव देण्यासाठी हा पुरस्कार दिला जातो. जानेवारी २०२१ मध्ये ‘आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ अवॉर्ड्स’ सुरू करण्यात आले.

माजी खेळाडू, पत्रकार आणि प्रसारक तसेच आयसीसीच्या वाहिनीवर मतदान करण्यासाठी आमंत्रित केलेल्या जगभरातील क्रिकेट चाहत्यांचा समावेश असलेल्या स्वतंत्र मतदान अकादमीद्वारे, पुरुष आणि महिला खेळाडूंचे महिन्याचे पुरस्कार निश्चित केले जातात.

महत्त्वाच्या बातम्या – 

भारत दौऱ्यासाठी न्यूझीलंडचे १५ शिलेदार घोषित; भारतीय वंशाच्या अष्टपैलूला मिळाली संधी

द्रविडच्या नियुक्तीनंतर भारतीय दिग्गज झाला आनंदित; ‘या’ शब्दात केले कौतुक

भारत-अफगाणिस्तान सामना फिक्स होता? वसीम अक्रम आणि वकार युनूस यांनी मांडले परखड मत

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---