---Advertisement---

भारत-अफगाणिस्तान सामना फिक्स होता? वसीम अक्रम आणि वकार युनूस यांनी मांडले परखड मत

On: गुरूवार, नोव्हेंबर 4, 2021 9:48 PM
Afghanistan vs India
---Advertisement---

टी२० विश्वचषकात सलग दोन पराभव पत्करल्यानंतर भारतीय संघाने बुधवारी (३ नोव्हेंबर) अफगाणिस्तानला नमवले. मात्र या विजयाने एका वेगळ्याच वादाला सुरुवात झाली आहे. टी-२० विश्वचषकात भारताने अफगाणिस्तानला पराभूत केल्यावर पाकिस्तानी चाहत्यांनी एका खराब गोष्टीचे प्रदर्शन केले आहे. भारताने हा सामना जिंकताच पाकिस्तानी चाहत्यांनी ट्विटरवर हा सामना फिक्स झाल्याचे सांगायला सुरुवात केली आणि अफगाणिस्तानने भारताला विश्वचषकात पुढे नेण्यासाठी मदत केली. मात्र पाकिस्तान संघाच्या माजी क्रिकेटपटूंनी हे सगळ्या गोष्टीचे खंडन केले आहे.

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामना फिक्स होता की नाही यावर बरीच चर्चा झाली आहे. हा सामना पूर्णपणे फिक्स होता, असा पाकिस्तानी चाहत्यांचा विश्वास होता. अनेक चाहत्यांनी हा सामना फिक्स होता असे म्हणताना कारणे दिली की अफगाणिस्तानने मुद्दाम खराब गोलंदाजी केली आणि भारतीय फलंदाजांचे सोपे झेल सोडले, जेणेकरून भारतीय संघाला सहज विजय मिळवता येईल आणि आपला नेट रनरेट सुधारून उपांत्य फेरीची शर्यत जिंकता येईल.

ट्विटर एका पाकिस्तानी चाहत्याने लिहिले, ‘अशा देशाला पाहून खूप वाईट वाटले, ज्याने संपूर्ण स्पर्धेत इतका उत्साह आणि जोश दाखवला. नंतर स्वतःला मोठ्या संघाला विकले आणि त्यांना जिंकू दिले. भारताने सज्जनांच्या खेळाचे सौंदर्य उध्वस्त करताना पाहून वाईट वाटले.’

मात्र, दिग्गज पाकिस्तानी गोलंदाज वसीम अक्रम आणि वकार युनूस यांनी मॅच फिक्सिंगचे दावे फेटाळून लावले आहेत आणि असे म्हटले आहे की अशा दाव्यांकडे दुर्लक्ष केले पाहिजे. वसीम अक्रमने संपूर्ण चर्चा निरर्थक असल्याचे म्हटले.

तो म्हणाला की, ‘पाकिस्तानमध्ये या सर्व कल्पित गोष्टी का? आणि कशा उभ्या राहिल्या आहेत, हे मला समजू शकलेले नाही.’ एका वाहिनीशी बोलताना वसीम म्हणाला, ‘मला कळत नाही की आपल्याला अशा प्रकारच्या गोष्टी बनवायला का आवडतात? भारत हा खूप चांगला संघ आहे. स्पर्धेच्या सुरुवातीला त्यांना काही वाईट काळ पहावा लागला.’

वसीम अक्रमचा सहकारी, वकार युनूसनेही अशीच भावना व्यक्त केली आणि तो म्हणाला, ‘असे बोलण्यात काही अर्थ नाही आणि लोकांनी याकडे फारसे लक्ष देऊ नये.’

असे असूनही, ट्विटरवर वेगवेगळ्या हॅशटॅगसह मॅच फिक्सिंगचा ट्रेंड सुरूच राहिला. भारताला विश्वचषकाच्या उपांत्य फेरी पर्यंत नेण्याच्या योजनेची ब्लू प्रिंटही पाकिस्तानी चाहत्यांनी सांगितली. ‘वेल पेड इंडिया’चा ट्रेंड प्रचंड व्हायरल झाला. अफगाणिस्तानच्या असगर अफगाणने तत्काळ निवृत्ती जाहीर केली, कारण त्याला अशा फिक्सिंगचा भाग बनायचे नव्हते, असेही म्हटले जात होते.

महत्त्वाच्या बातम्या –

द वॉल.! कसोटीमधील ‘हे’ तीन रेकॉर्ड राहुल द्रविडची शान अधिक वाढवतात

‘हा’ देश ठरू शकतो भारत-पाक कसोटी मालिकेसाठी आदर्श ठिकाण; चाहते करतात तोबा गर्दी

‘कमबॅक बॉय’ अश्विनबद्दल कॅप्टन कोहलीचे महत्त्वपूर्ण विधान; म्हणाला…

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---