7 फेब्रुवारीपासून आयसीसी पुरुष टी-20 विश्वचषक 2026 (ICC T20 international world cup 2026) ला सुरुवात होत असून, स्पर्धेपूर्वीच विक्रम आणि आकडेवारीची चर्चा रंगली आहे. टी-20 विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक बळी (विकेट्स) घेणाऱ्या गोलंदाजांची यादी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मात्र, या यादीत एक धक्कादायक गोष्ट म्हणजे टॉप-5 मध्ये एकाही भारतीय गोलंदाजाचा समावेश नाही.
शाकिब अल हसन (बांगलादेश): विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम शाकिबच्या (Shaqib al hasan) नावावर आहे. त्याने 2007 ते 2024 दरम्यान 43 सामन्यांत 50 विकेट्स घेतल्या आहेत.
शाहिद आफ्रिदी (पाकिस्तान): या यादीत दुसऱ्या क्रमांकावर पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी (Shahid Afridi) आहे. त्याने 34 सामन्यांत 39 विकेट्स घेतल्या आहेत.
लसिथ मलिंगा (श्रीलंका): श्रीलंकेचा दिग्गज वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा (Lasith Malinga) 31 सामन्यांत 38 विकेट्ससह तिसऱ्या स्थानावर आहे. त्याचे यॉर्कर आजही फलंदाजांसाठी भीतीचा विषय आहेत.
वानिंदु हसरंगा (श्रीलंका): श्रीलंकेच्या या स्टार फिरकीपटूने कमी सामन्यांत 37 विकेट्स घेऊन या यादीत आपले स्थान पक्के केले आहे.
राशिद खान (अफगाणिस्तान): अफगाणिस्तानचा राशिद खान (Rashid Khan) देखील 37 विकेट्ससह या खास क्लबचा भाग आहे. त्याने आपल्या फिरकीने जगातील मोठ्या फलंदाजांना अडचणीत आणले आहे.
7 फेब्रुवारीपासून स्पर्धेला सुरुवात झाली आहे. पहिला सामना पाकिस्तान आणि नेदरलँड्स यांच्यात कोलंबोमध्ये खेळवला जाईल. ही स्पर्धा 8 मार्चपर्यंत चालणार आहे. फायनलसाठी अहमदाबाद आणि कोलंबो ही दोन ठिकाणे निश्चित केली आहेत. पाकिस्तानचा संघ अंतिम फेरीत पोहोचतो की नाही, यावर फायनल नक्की कुठे होणार हे ठरवले जाईल.






