वनडे विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला सुरू होण्यासाठी आता आठवडाभराचा अवधी शिल्लक राहिला आहे. अहमदाबाद येथे 5 ऑक्टोबरपासून विश्वचषकाला सुरुवात होईल. तत्पूर्वी, 29 सप्टेंबर पासून सराव सामन्यांना सुरुवात होत आहे. याआधीच बांगलादेश क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला. बांगलादेश संघाचा कर्णधार शाकिब अल हसन याला दुखापत झाली असून, तो स्पर्धेतील पहिल्या सामन्याला मुकण्याची शक्यता आहे.
अनेक वादानंतर या स्पर्धेसाठी बांगलादेश संघाची संघनिवड सर्वात अखेरीस केली गेलेली.. विश्वचषकात अष्टपैलू शाकिब संघाचे नेतृत्व करताना दिसेल. तत्पूर्वी 29 सप्टेंबर रोजी श्रीलंका व बांगलादेश यांच्या दरम्यान गुवाहाटी येथे पहिला सराव सामना खेळला जातोय. या सामन्यात शाकिब संघाचा भाग नाही.
मिळत असलेल्या माहितीनुसार, सामन्यापूर्वी फुटबॉल खेळताना शाकिबला दुखापत झाली आहे. त्यामुळे तो दोन्ही सराव सामन्यात खेळणार नाही. तसेच विश्वचषकातील पहिल्या सामन्यात देखील तो खेळण्याची शक्यता कमी आहे. बांगलादेश आपल्या विश्वचषक मोहिमेची सुरुवात सात ऑक्टोबर रोजी अफगाणिस्तानविरुद्ध करेल. शाकिब या सामन्यासाठी उपलब्ध नसल्यास संघाचे नेतृत्व लिटन दास करेल.
विश्वचषकासाठी बांगलादेश संघ:
शाकिब अल हसन (कर्णधार), लिटन दास, तंजीद हसन तमीम, नजमुल हुसेन शान्तो (उपकर्णधार), तौहीद हृदोय, मुशफिकुर रहीम, महमूदुल्लाह रियाद, मेहिदी हसन मिराज, नसुम अहमद, महेदी हसन, तस्कीन अहमद, मुस्तफिजुर रहमान, हसन महमूद , शोरिफुल इस्लाम, तंजीम हसन साकिब.
(Shakib Al Hasan Injured While Playing Football Likely Missing World Cup First Match)
हेही वाचा-
दक्षिण आफ्रिकेला तगडा झटका! वर्ल्डकप 2023पूर्वी मायदेशी परतला कॅप्टन, कोण हाकणार संघाचा गाडा?
BREAKING: विश्वचषकाच्या तोंडावर ऑस्ट्रेलियाने केला संघात बदल, तुफानी फॉर्ममधील खेळाडूला दिली एंट्री