इंडियन प्रीमियर लीगच्या सोळाव्या हंगामाला सुरुवात होऊन हे चारच दिवस झाले आहेत. प्रत्येक संघाने आपला पहिला सामना खेळला असून, कोलकाता नाईट रायडर्स संघाला आपल्या सलामीच्या सामन्यात पराभव पत्करावा लागला. यापूर्वीच अनेक संकटांशी झुंजत असलेल्या केकेआर संघाला आता आणखी एक धक्का बसला आहे. बांगलादेशचा कर्णधार व केकेआरचा सदस्य असलेला शाकिब अल हसन याने संपूर्ण आयपीएल हंगामातून माघार घेतल्याचे वृत्त समोर येतेय.
एका आघाडीच्या क्रिकेट संकेतस्थळाने दिलेल्या बातमीनुसार, शाकिब आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी तयार होण्याकरिता तसेच काही वैयक्तिक कारणाने आयपीएलच्या संपूर्ण हंगामासाठी उपलब्ध राहणार नव्हता. त्याने फ्रॅंचाईजी व संघ व्यवस्थापनाशी चर्चा केल्यानंतर हंगामातून बाहेर होण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे त्याच्या जागी दुसऱ्या खेळाडूला संघ व्यवस्थापन लवकरच करारबद्ध करेल. हा निर्णय संमतीने झाला असल्याने, यामागे कोणताही वाद नसेल.
केकेआर त्याच्या जागी श्रीलंकेचा कर्णधार दसुन शनाका अथवा ऑस्ट्रेलियाचा ट्रेविस हेड यांना करारबद्ध करण्याची शक्यता आहे.
शाकिब सध्या बांगलादेश क्रिकेट संघाचा कर्णधार आहे. आगामी काळात बांगलादेश संघाला वनडे विश्वचषकासाठी तयारी करायचे असून, त्यासाठी शाकिब तंदुरुस्त राहू इच्छितो. केकेआरने त्याला दीड कोटी रुपयांच्या बेस प्राईजवर आपल्या संघात सामील करून घेतले होते. शाकिब यापूर्वी देखील केकेआर संघाचा भाग राहिला आहे. 2012 व 2014 मध्ये केकेआरने जिंकलेल्या आयपीएल विजेतेपदावेळी तो संघाचा भाग होता.
त्याच्या एकूण आयपीएल कारकिर्दीचा विचार केल्यास, त्याने 71 सामने खेळताना 793 धावा केल्या आहेत. तसेच, 63 बळी मिळवण्यात देखील त्याला यश आले. त्याने केकेआर व्यतिरिक्त सनरायझर्स हैदराबाद संघाचे प्रतिनिधित्व केले आहे.
(Shakib Al Hasan Might Opt Out From IPL 2023 For KKR)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
चार वर्षांनंतर चेपॉकवर उडाला टॉस! लखनऊचा गोलंदाजीचा निर्णय, सीएसके करणार फलंदाजी
विजयानंतरही आरसीबीचे वाढले टेन्शन! टोप्लीच्या दुखापतीने गोलंदाजी आक्रमण लंगडे? दुखापतग्रस्तांची वाढली यादी