रविवारी (३ ऑक्टोबर) दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये आयपीएलचा ४९ वा सामना पार पडला. या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद संघ एकमेकांशी भिडले आणि केकेआरने सहा विकेट्सने सामना जिंकला. केकेआरला जिंकण्यासाठी मोठे आव्हान मिळाले नव्हते, पण तरीदेखील सामना शेवटच्या षटकापर्यंत गेला. हैदराबादला मोठी धावसंख्या करता न येण्यामागचे महत्त्वाचे कारण ठरले, त्यांचा कर्णधार केन विलियम्सनची विकेट. तो दुर्देवाने धावबाद झाला.
विलियम्सनने २१ चेंडूंमध्ये २६ धावा केल्या आणि धावबाद झाला. केकेआरच्या शाकिब अल हसनने मारलेल्या थेट फेकीचा तो बळी ठरला आणि त्यानंतर सामना केकेआरच्या बाजून झुकलेला पाहायला मिळाला.
हैदराबादच्या फलंदाजीवेळी १६ धावांपर्यंत जेसन रॉय आणि वृद्धिमान साहा बाद होऊन पॅवेलियनमध्ये परतले होते. मैदानात कर्णधार केन विलियम्सन आणि प्रियम गर्ग हे दोघे हैदराबादचा डाव सावरण्याच्या प्रयत्नात होते. विलियम्सन २० चेंडूत २६ धावांवर खेळत होता. अशात शाकिब अल हसनच्या गोलंदाजीवेळी त्याने त्याची विकेट गमावली.
शाकिब अल हसनने त्याच्या स्वत:च्या षटकामध्ये उत्कृष्ट क्षेत्ररक्षण केलेले पाहायला मिळाले आणि चेंडू थेट स्टंपवर मारला. शाकिबने मारलेला चेंडू योग्य निशाण्यावर लागल्यामुळे विलियम्सनला पॅवेलियनमध्ये परतावे लागले. विलियम्सन बाद झाल्यनंतर हैदराबाद संघ पुन्हा सामन्यात पुनरागमन करू शकला नाही.
व्हिडिओ पाहाण्यासाठी येथे क्लिक करा
दरम्यान, सामन्यात सुरुवातीला हैदराबादने नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण नंतर त्यांचा हा निर्णय चुकीचा ठरला आणि संघाने २० षटकांमध्ये ८ विकेट्स गमावून अवघ्या ११५ धावा केल्या. प्रत्युत्तरात केकेआरने १९.४ षटकात आणि सहा विकेट्स राखून हैदराबादने दिलेले लक्ष्य गाठले आणि सामन्यात विजय मिळवला. केकेआरसाठी सलामीवीर शुभमन गिलने ५१ चेंडूंमध्ये सर्वाधिक ५७ धावांची खेळी केली आणि संघाच्या विजयात महत्वाची भूमिका पार पाडली. सामना संपल्यानंतर त्याला सामनावीर निवडण्यात आले.
महत्त्वाच्या बातम्या –
वाईट झालं! पाकिस्तानाच्या ‘या’ खेळाडूच्या बहिणीचे निधन, भावनिक पोस्ट करत दिली माहिती
गुणतालिकेतील दोन अव्वल संघ येणार आमने-सामने; पाहा दोन्ही संघांची संभावित ‘प्लेइंग इलेव्हन’
टी२० क्रिकेटमध्ये बाबर आजमची विश्वविक्रमी कामगिरी; विराट कोहली अन् ख्रिस गेलला टाकलंय मागे






