---Advertisement---

बडा याराना लगता है! विराटने पंचांकडे नो-बॉलची मागणी करताच शाकिबने मारली मिठी, व्हिडिओ व्हायरल

Shakib-Al-Hasan-And-Virat-Kohli
---Advertisement---

भारत आणि बांगलादेश संघात बुधवारी (दि. 02 नोव्हेंबर) टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेतील 35वा सामना ऍडलेड येथे पार पडला. या सामन्यात भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली आणि बांगलादेश संघाचा कर्णधार शाकिब अल हसन यांच्यात मैदानावर मैत्रीपूर्ण दृश्य दिसले. यादरम्यानचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत. चला तर या मैत्रीपूर्ण दृश्य घडण्यामागे काय कारण होते, हे जाणून घेऊया…

बांगलादेश संघाने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी भारतीय संघाने फलंदाजीला येत निर्धारित 20 षटकात 6 विकेट्स गमावत 184 धावा चोपल्या. यामध्ये केएल राहुल (KL Rahul) आणि विराट कोहली (Virat Kohli) याने अर्धशतक झळकावत सर्वाधिक धावांचे योगदान दिले. मात्र, डावाच्या 16व्या षटकादरम्यान असे काहीतरी घडले, ज्याने सर्वांचेच लक्ष वेधले.

झाले असे की, 16व्या षटकात जे काही घडले, त्यामुळे शाकिब अल हसन (Shakib Al Hasan) हा विराटवर खुश नव्हता. हे षटक टाकत असलेल्या हसन महमूद याने 5वा चेंडू कमेच्या वर फुलटॉस टाकला. यावर विराटने धाव घेतली. तसेच, लगेच स्क्वेअर लेग पंच मरे इरॅस्मस (Marais Erasmus) यांना नो- बॉलसाठी विचारणा केली. त्यानंतर पंचांनीही नो-बॉलसाठी हात वर केला. मात्र, फलंदाज पंचांच्या निर्णयात हस्तक्षेप करू शकत नाहीत, असे वाटल्याने नो-बॉल मागितल्याने शाकिब कोहलीवर नाराज होता. कोहली आणि शाकिब दोघांनी एकमेकांना मिठी मारल्याने हा वाद जागीच मिटला.

https://twitter.com/kansana45/status/1587739483642171393

https://twitter.com/shivaniiiiiiii_/status/1587737359189434370

भारतीय संघाचा डाव
भारतीय संघाकडून या सामन्यात विराट कोहली याने सर्वाधिक धावा चोपल्या. त्याने यावेळी 44 चेंडूत नाबाद 64 धावा चोपल्या. या धावा करताना त्याने 1 षटकार आणि 8 चौकारही मारले. याव्यतिरिक्त केएल राहुल याने 32 चेंडूत 50 धावा करत अर्धशतक साकारले. यादरम्यान त्याने 3 चौकार आणि 4 षटकारही भिरकावले. यांच्याव्यतिरिक्त सूर्यकुमार यादव यानेही 30 धावांचे योगदान दिले. शेवटच्या षटकात आर अश्विन याने 6 चेंडूत 1 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 13 धावा लुटल्या आणि संघाची धावसंख्या 184पर्यंत नेण्यात मोलाचा वाटा उचलला.

यावेळी बांगलादेशकडून हसन महमूद याने सर्वाधिक विकेट्स घेतल्या. त्याने 4 षटकात 47 धावा देत 3 विकेट्स चटकावल्या. त्याच्याव्यतिरिक्त कर्णधार शाकिब अल हसन यानेही 2 विकेट्स घेण्याची कामगिरी केली.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पुन्हा एकदा विराटची ‘राजेशाही’ खेळी! टीम इंडियाचे बांगलादेशसमोर 185 धावांचे आव्हान
एका चेंडूने बनवले व्हिलन एकाने हिरो! जीवदान मिळाल्यावर दोन चेंडूच टिकू शकला रोहित

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---