---Advertisement---

बांगलादेशचा अष्टपैलू शाकिब सध्या क्रिकेट खेळण्याच्या नाही मनस्थितीत; म्हणाला, ‘मला मोठा ब्रेक पाहिजे’

On: सोमवार, मार्च 7, 2022 5:30 PM
Shakib-Al-Hasan
---Advertisement---

बांगलादेश क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसन (Shakib Al Hasan) सध्या त्याच्या मानसिक आणि शारिरीक तंदुरुस्तीला पाहता, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून ब्रेक घेऊ (Shakib Al Hasan Wants Break From Cricket) इच्छित आहे. नुकतीच बांगलादेश क्रिकेट बोर्डाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे आणि कसोटी मालिकेसाठी आपले संघ जाहीर केले आहेत. या दोन्ही संघांमध्ये शाकिबचे नाव आहे. परंतु शाकिब सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याच्या मनस्थितीत नसल्याचे त्याने खुद्द सांगितले आहे. 

ईएसपीएनक्रिकइंफोने शाकिबच्या हवाल्याने लिहिले आहे की, “माझ्या मानसिक आणि शारिरीक स्थितीला पाहता, मला नाही वाटत की मी जास्त आंतरराष्ट्रीय सामने खेळू शकतो. जर मला ब्रेक मिळाला, तर माझा क्रिकेटमधील रस पुन्हा वाढेल. त्यानंतर मी पूर्वीप्रमाणे खेळू शकेल. मी अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकांमध्ये एका यात्रीच्या रूपात गेलो होतो. मी त्यांच्याविरुद्धच्या वनडे आणि टी२० मालिकेचा आनंद नाही घेतला. मला नाही वाटत की, मी अशा मनस्थितीत दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जावे. जेव्हा मी खेळत असतो, तेव्हा मला सर्वांच्या अपेक्षांवर खरे उतरावे असे वाटते.”

हेही वाचा- तंबूत गेलेल्या खेळाडूला शाकिब अल हसनमुळे मिळालं जीवदान; पण क्रिकेटरनं असं केलं तरी काय? वाचा

“मी सध्या माझ्या सर्वश्रेष्ठ प्रदर्शनाची हमी देऊ शकत नाही. परंतु मला कमीत कमी इतके तरी माहिती होईल की, मी माझ्या देशासाठी सर्वोत्कृष्ट प्रयत्न केले. मी वेळ किंवा कोणाची जागा वाया घालवू इच्छित नाही. असे एका यात्रीच्या रूपात खेळणे सर्वांचा विश्वासघात केल्यासारखे आहे. असे मी माझ्या संघ सहकारी आणि देशाला धोखा देतोय, असे मला वाटतेय.”

“मी जलाल भाऊला याबद्दल सांगितले होते. पण त्यांनी मला काही दिवस यावर विचार करायला सांगितले होते. मी त्यानंतर एका निर्णयाची अपेक्षा करत आहे. मी यापूर्वी पापोन भाऊशी बोललो होतो की, मी अजून २ मालिका खेळेल. परंतु मी कालच्या सामन्यानंतर खूप विचार केला. माझी मानसिक आणि शारिरिक स्थिती पाहता मला थोडा रिकामा वेळ पाहिजे आहे. चांगल्या शारिरीक स्थितीत मी कसोटी क्रिकेट खेळण्यासाठी वनडे क्रिकेट टाळू शकतो.”

“मला वाटते की, कारकिर्दीच्या या टप्प्यावर मला लाँग टर्म प्लॅनिंगची गरज आहे. मला वाटते की, मी बोर्डासोबत सर्व गोष्टी स्पष्ट करायला पाहिजेत. मी बोर्डाला जे पत्र पाठवले आहे, त्यामध्ये ६ महिन्यांचा ब्रेकबद्दल मी काहीही लिहिलेले नाही. मी बोर्डाला सांगितले होते की, मी २०२२ मध्ये २२ नोव्हेंबरपर्यंत कसोटी संघातून बाहेर राहू इच्छितोय. मला पूर्णपणे पांढऱ्या चेंडूंच्या क्रिकेट सामन्यांवर लक्ष केंद्रित करायचे आहे. येत्या २ वर्षात आम्हाला २ विश्वचषक खेळायचे आहेत. मला पूर्णपणे कसोटी क्रिकेट सोडायचे नाही. कारण आम्हाला कसोटी संघात चांगला ताळमेळ बनवायचा आहे. पण मी माझी फिटनेस आणि वयाला ध्यानात घेऊन पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटवर फोकस करेन. जेणेकरून मी वनडे आणि टी२० मध्ये चांगले प्रदर्शन करू शकेल,” असेही शाकिबने सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या-

आयपीएल २०२२ मध्ये सीएसके संघाकडून ऋतुराज गायकवाडसोबत ‘हे’ ३ खेळाडू करू शकतात ओपनिंग

आयपीएल खेळण्यासाठी न्यूझीलंडचे खेळाडू टाळणार ‘या’ देशाविरुद्धच्या मालिका, प्रशिक्षकांची माहिती

‘या’ खेळाडूचे पुनरागमन झाल्याने कुलदीप यादवचा पत्ता कट, डे-नाइट कसोटीसाठी टीम इंडियात मोठा बदल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---