भारतीय क्रिकेट संघ म्हटलं की, सर्वांना अधिकतर आठवतात ते सचिन तेंडुलकर, एमएस धोनी, विराट कोहली. याप्रमाणेच बांग्लादेश क्रिकेट संघाचं नाव घेतलं की सर्वांना आठवतो शाकिब अल हसन. बांग्लादेश क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू शाकिब हा फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्हींमध्येही जबरदस्त प्रदर्शन करतो.
अशा या दमदार क्रिकेटपटूची पत्निही बांग्लादेशमध्ये खूप प्रसिद्ध आहे. शाकिबची पत्नि उम्मी अहमद शिशिर ही तिच्या सुंदरतेमुळे नेहमी चर्चेत असते. परंतु, २०१४ला स्टेडियममध्ये उम्मीसोबत जे काही घडले, त्याची कुणी कल्पनाही करु शकत नाही.
२०१४ला बांग्लादेश विरुद्ध भारत संघात मीरपुर येथे वनडे सामना चालू होता. त्यावेळी शाकिबची पत्नी उम्मीदेखील सामना पाहण्यासाठी आली होती. त्यावेळी स्टेडियमच्या बालकनीमध्ये एका व्यावसायिकाच्या मुलाने अतिशय घाणेरडे शब्द वापरत उम्मीचा लैंगिक छळ केला होता. जेव्हा शाकिबला या गोष्टीची माहिती झाली, तेव्हा तो लगेच सुरक्षा कर्मचाऱ्यांना घेऊन स्टेडियमच्या बालकनीमध्ये पोहोचला आणि आरोपी व्यावसायिकाच्या मुलाला मारहाण केली. त्यानंतर पोलिसांनी त्या व्यावसायिकाला अटक केले होते.
१२ डिसेंबर २०१२ला शाकिब आणि उम्मीचे लग्न झाले होते. उम्मी ही १० वर्षांची असल्यापासून आपल्या कुटुंबासोबत अमेरिकेत राहत होती. ती सुट्ट्यांमध्ये इंग्लंडला गेली होती. त्यावेळी काउंटी क्रिकेट खेळण्यासाठी शाकिबही इंग्लंडला गेला होता. दोघेही एकाच हॉटेलमध्ये थांबले होते आणि तिथेच त्यांची पहिल्यांदा भेट झाली होती. तिथून त्यांच्या प्रेमकहानीची सुरुवात झाली आणि शेवटी त्यांचे लग्न झाले. त्यांना आता २ मुले आहेत
उम्मी अमेरिकेतच मोठी झाली आहे. त्यामुळे तिचे राहणीमान, वागणूक अमेरिकेप्रमाणे आहेत. तिला पार्टीमध्ये जाण्याची खूप हौस आहे. शिवाय ती इंजिनिअर आहे आणि ती मॉडलिंगही करते.
ट्रेंडिंग घडामोडी-
ब्रेकिंग: इंग्लंड दौऱ्यासाठी वेस्ट इंडिजच्या कसोटी संघाची घोषणा
कोरोनामुळे दुसऱ्या मोठ्या क्रिकेटपटूचा बळी, कुटूंबाने घाईगबडीत…
विश्वचषकात मानाची ‘गोल्डन बॅट’ मिळवण्याचा पराक्रम करणारे…