बांगलादेश आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच टी२० सामन्यांच्या मालिकेत यजमान बांगलादेशने ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक विजय मिळवत ४-१ ने मालिका आपल्या नावे केली. ऑस्ट्रेलियाचा हा आजवरचा सर्वात मानहानीकारक पराभव असल्याचे बोलले जात आहे. या मालिकेच्या समाप्तीनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) टी२० खेळाडूंची वैयक्तिक क्रमवारी जाहीर केली आहे. त्यामध्ये बांगलादेशच्या खेळाडूंना मोठा फायदा झालेला दिसून येतोय.
बांगलादेशचा ऐतिहासिक मालिका विजय
टी२० क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच द्विपक्षीय टी२० मालिकेत समोरासमोर आलेल्या बांगलादेश आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील मालिका अटीतटीची होईल अशी सर्वांना अपेक्षा होती. मात्र, बांगलादेशने दुय्यम दर्जाच्या ऑस्ट्रेलिया संघाला पूर्णपणे नामोहरम करत ४-१ असा एकतर्फी विजय साजरा केला. ऑस्ट्रेलिया या मालिकेत आपल्या प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत उतरली होती. या संघाचे नेतृत्व यष्टीरक्षक मॅथ्यू वेड यांच्याकडे देण्यात आलेले.
बांगलादेश खेळाडूंचा क्रमवारी बोलबाला
ऑस्ट्रेलियाविरुद्ध बांगलादेशच्या सर्वच खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी बजावली. त्याचाच फायदा या खेळाडूंना नव्या टी२० क्रमवारीत झाला. बांगलादेशचा सर्वात अनुभवी अष्टपैलू शाकिब अल हसन याने संपूर्ण मालिकेत फलंदाजी व गोलंदाजीत आपले योगदान देत संघाच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली. या कामगिरीमुळे तो अफगाणिस्तानच्या मोहम्मद नबीला मागे टाकत पुन्हा एकदा अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत पहिल्या स्थानी पोहोचला.
मुस्तफिझुरची ऐतिहासिक मजल
ऑस्ट्रेलियाविरुद्ध बांगलादेशचा प्रमुख टी२० वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमानने शानदार गोलंदाजीचे प्रदर्शन केले. तो संपूर्ण मालिकेत कंजूस गोलंदाजी सोबतच बळी घेण्यात यशस्वी ठरला. त्याने या नव्या क्रमवारीत तब्बल २० स्थानांची उडी घेतली. या मालिकेपूर्वी ३० व्या क्रमांकावर असलेला मुस्तफिझुर आता पहिल्या १० टी२० गोलंदाजांत सामील झाला आहे. विशेष म्हणजे भारताचा एकही अष्टपैलू व गोलंदाज पहिल्या दहामध्ये सामील नाही.
महत्त्वाच्या बातम्या –
टी-२० विश्वचषक स्पर्धेनंतर रवी शास्त्री भारतीय संघाला करणार राम राम; संघात होऊ शकतात मोठे बदल
रविंद्र जडेजाची अप्रतिम कामगिरी पाहून सेहवाग भलताच खुश; म्हणाला, ‘मला अजूनही आठवतय…’
“भारत सहजरित्या मालिका खिशात घालेल”, दिग्गज गोलंदाजाने टाकले टीम इंडियाच्या पारड्यात वजन