सध्या बांगलादेश संघ कसोटी मालिका खेळण्यासाठी पाकिस्तान दौऱ्यावर आहे. बांगलादेशनं पहिल्याच सामन्यात इतिहास रचला. रावलपिंडी येथे झालेल्या या सामन्यात बांगलादेशनं पाकिस्तानचा 10 गडी राखून पराभव करत कसोटी इतिहासात पाकिस्तानविरुद्ध विजयाचं खातं उघडलं. घरच्या मैदानावर पाकिस्तानला पहिल्यांदाच कसोटी सामन्यात 10 गडी राखून निराशाजनक पराभव पत्करावा लागला. या सामन्यात बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू शकीब अल हसननं असं काही केलं, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला.
बांगलादेशचा स्टार अष्टपैलू खेळाडू शकीब अल हसन सामन्यादरम्यान अनेक वेळा आपला राग गमावून बसताना दिसला आहे. शेवटच्या दिवशी बांगलादेशला विजयासाठी झटपट विकेट्सची गरज होती, त्यामुळे रिझवाननं मैदानावर वेळ वाया घालवण्याच्या हालचालींना सुरुवात केली. डावातील 33वं षटक टाकत असलेला शाकीब नाराज झाला आणि त्यानं मुद्दाम बांगलादेशच्या यष्टीरक्षकाकडे चेंडू फेकला जो रिझवानच्या डोक्यावरून गेला. रिझवान फलंदाजीलाही तयार नव्हता. शाकिबचं हे कृत्य पाहून अंपायरनं त्याला मैदानावरच फटकारले.
Shakib 😭😭🤣🤣 #PakistanCricket #PAKvBAN #ShakibAlHasan pic.twitter.com/sgBE5kRqYm
— Jack (@jackyu_17) August 25, 2024
तत्पूर्वी, शाकिब अल हसनवर नुकताच बांगलादेशातील हिंसाचाराच्या दरम्यान हत्येच्या प्रकरणात आरोपी म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाकिस्तान आणि बांगलादेश सामन्यादरम्यान शाकीबनं रिझवानच्या डोक्यावरुन रागात फेकलेल्या कृतींमुळे तो पुन्हा चाहत्यांच्या निशान्यावर आला आहे. एका युजरकर्त्यानं या व्हिडिओला कमेंट करत लिहलं की, “नक्की यानंच हत्या केली आहे.”
महत्त्वाच्या बातम्या-
‘कोहलीने आणखी काही वर्षे कसोटी कर्णधारपदी राहायला हवे होते,’ माजी प्रशिक्षकाचा प्रश्न
कोहलीच्या आधी रूटच्या निशान्यावर ‘या’ महान दिग्गजाचा रेकाॅर्ड!
इंग्लंडच्या अडचणी वाढल्या, बेन स्टोक्सनंतर आणखी एक धोकादायक खेळाडू गंभीर जखमी