माऊंट मॉनगनुई। उद्या (11 फेब्रुवारी) भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात बे ओव्हल येथे 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील तिसरा सामना होणार आहे. या सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि अष्टपैलू क्रिकेटपटू रविंद्र जडेजाला परदेशात 100 वनडे विकेट्स पूर्ण करण्याची संधी आहे.
परदेशात खेळताना 100 वनडे विकेट्सचा हा टप्पा पूर्ण करण्यासाठी शमीला 1 विकेटची तर जडेजाने 3 विकेट्सची गरज आहे. सध्या परदेशात खेळताना भारताकडून 9 गोलंदाजांनी वनडेमध्ये 100 किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेतल्या आहेत.
तसेच सध्या शमी परदेशात सर्वाधिक वनडे विकेट्स घेणाऱ्या भारतीयांच्या यादीत 10 व्या, तर जडेजा 11 व्या क्रमांकावर आहेत. शमीच्या नावावर सध्या परदेशात खेळताना 50 वनडे सामन्यात 99 विकेट्स आहेत आणि जडेजाच्या नावावर 102 सामन्यात 97 विकेट्स आहेत.
वनडेमध्ये परदेशात खेळताना सर्वाधिक विकेट्स घेणारे भारतीय गोलंदाज –
212 – जवागल श्रीनाथ
208 – अनिल कुंबळे
179 – अजित अगरकर
175 – जहिर खान
155 – हरभजन सिंग
153 – कपिल देव
132 – वेंकटेश प्रसाद
127 – इरफान पठाण
113 – आशिष नेहरा
99 – मोहम्मद शमी
97 – रविंद्र जडेजा
केवळ २ भारतीयांना जमलेला ‘तो’ विक्रम करण्याची विराट कोहलीला सुवर्णसंधी
वाचा????https://t.co/hR2bLcOM9s????#म #मराठी #Cricket #TeamIndia #NZvIND— Maha Sports (@Maha_Sports) February 10, 2020
पवारांच्या बारामतीत रणजी सामना खेळणार विश्वविजेता कर्णधार
वाचा????https://t.co/THwdrv7Uav????#म #मराठी #Cricket— Maha Sports (@Maha_Sports) February 10, 2020






