---Advertisement---

शमीच्या ढिल्या सुरुवातीचा फायदा, बाबर-इमामला मिळाली स्थिरता!

On: रविवार, फेब्रुवारी 23, 2025 3:12 PM
---Advertisement---

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत आज भारतीय संघासमोर पाकिस्तान संघाच आव्हान आहे. दुबईच्या स्टेडियमवर आज सामना खेळला जात आहे. पाकिस्तान संघाने टॉस जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तत्पूर्वी आता चार षटकारानंतर पाकिस्तान संघाने 22 धावा केल्या आहेत. पहिली षटकार मोहम्मद शमीने टाकलेली आहे. ज्यामध्ये त्यांनी पाच वाईड चेंडू टाकले आहेत. तसेच दुसरा षटकार हर्षित राणाने टाकलेला आहे त्याचबरोबर तिसरा षटकार शमी ने टाकून पुन्हा चौथा षटकार हर्षित राणा टाकणार आहे.

भारतीय संघाने त्यांच्या पहिल्या सामन्यात बांगलादेशला 6 विकेट्सने पराभूत केले होते. तसेच पाकिस्तान संघ सुद्धा न्यूझीलंड कडून 60 धावांनी पराभूत झाला होता. आज भारतीय संघ जिंकून सेमीफायनल मध्ये पोहोचण्याचा पूर्ण प्रयत्न करेल.

आजच्या सामन्यात पाकिस्तान संघात बदल करण्यात आलेला आहे. सलामीवीर फलंदाज फखर जमान न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात दुखापती झाल्यामुळे तो स्पर्धेच्या बाहेर पडला आहे. तसेच भारतीय संघात कोणताही बदल झालेला दिसून आलेला नाही. बांगलादेश विरुद्ध जो भारतीय संघ खेळला होता, तोच आजही खेळत आहे.

दुबईच्या स्टेडियमवर भारतीय संघाचा पाकिस्तान विरुद्ध शानदार रेकॉर्ड आहे. भारतीय संघाने एशिया कप 2018 मध्ये पाकिस्तान विरुद्ध दोन सामने खेळले आहेत आणि दोन्ही सामन्यात भारतीय संघ विजयी झालेला आहे. त्यावेळी पहिल्या सामन्यात पाकिस्तानला आठ विकेट्स ने पराभूत केले होते आणि दुसऱ्या सामन्यात 9 विकेट्सने पाकिस्तानवर भारतीय संघाने विजय मिळवला होता.

चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये भारत आणि पाकिस्तान पाच वेळा समोरासमोर आलेले आहेत. त्यावेळी पाकिस्तान संघाने भारतीय संघाला तीन वेळा पराभूत केले आहे. 2004 मध्ये इंग्लंड, 2009 मध्ये साऊथ आफ्रिका, आणि 2017 मध्ये पाकिस्तान संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकलेली आहे. भारत आणि पाकिस्तान मध्ये एकूण 135 वनडे सामने खेळले आहेत, त्यातील 57 सामने भारत जिंकलेला आहे. तसेच 73 सामने पाकिस्तान संघ जिंकलेला आहे. त्यातील पाच सामन्यांचा रिझल्ट आलेला नाही.

चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये भारत आणि पाकिस्तान ग्रुप ए मध्ये आहेत. त्यांच्यासोबत न्युझीलँड आणि बांगलादेश संघ सुद्धा ए ग्रुप मध्ये आहेत. ग्रुप बी मध्ये साऊथ आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान आणि इंग्लंड संघ आहेत. सर्व आठ संघ आपापल्या ग्रुपमध्ये तीन तीन सामने खेळणार आहेत. त्यानंतर दोन्ही ग्रुपमधील टॉप दोन संघ सेमीफायनल साठी क्वालिफाय करतील. जर कोणता संघ अंतिम सामन्यापर्यंत पोहोचला तर तो स्पर्धेमध्ये एकूण पाच सामने खेळेल.

हेही वाचा 

भारत विरुद्ध पाकिस्तान महामुकाबला! कोहली की बाबर, कोण उंचावणार विजयाचा झेंडा?

IND vs PAK: पाकिस्तानने जिंकला टाॅस फलंदाजीचा निर्णय, पाहा दोन्ही संघाच्या प्लेइंग 11

15 धावा आणि विश्वविक्रम..! किंग कोहली पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात इतिहास रचणार?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---