इंग्लंडमध्ये जर ढगाळ वातावरण असेल आणि खेळपट्टीवर जर ओलावा असेल, तर जगातील मोठ्यात मोठ्या फलंदाजाला देखील जास्त वेळ खेळपट्टीवर टिकून राहणे कठीण जाते. त्यातही जर जोफ्रा आर्चर, जेम्स अँडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉड असे वेगवान गोलंदाज समोर असतील, तर फलंदाजाची चांगलीच कसोटी असते. पण, पाकिस्तानचा सलामीवीर फलंदाज शान मसूद मॅनचेस्टर येथे चालू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात केवळ खेळपट्टीवर जास्त वेळ टिकून राहिला नाही. तर, त्याने ४६ धावाही केल्या.
पण, विशेष बाब ही आहे की, मसूदने मॅनचेस्टरच्या मैदानावर सलामीला येऊन १०० पेक्षा जास्त चेंडू खेळले आहेत. त्यामुळे तो पराक्रम मसूदच्या नावावर झाला आहे, जो गेल्या ४ वर्षांत इंग्लंडच्या मैदानावर जगातील कोणताही सलामीवीर फलंदाज करू शकला नाही. Shan Masood Is The First Opener To Face 100 Balls In The First Inning Of Test In England Since 2016
२०१६ नंतर मसूद हा पहिला सलामीवीर फलंदाज आहे, ज्याने इंग्लंडमध्ये इंग्लंडविरुद्ध कसोटी सामन्यातील पहिल्या डावातच सलामीला फलंदाजी करताना १०० पेक्षा जास्त चेंडू खेळले आहेत. त्याच्यापुर्वी वेस्ट इंडिजचा सलामीवीर फलंदाज कायरन पॉवेलने लॉर्ड्समधील कसोटी सामन्यात ९८ चेंडू खेळले होते. तर, ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर फलंदाज डेव्हिड वॉर्नरने इंग्लंडमधील कसोटी सामन्यात ९४ चेंडू तर भारताचा सलामीवीर फलंदाज शिखर धवनने ६५ चेंडू खेळले होते.
काल (५ ऑगस्ट) मॅनचेस्टर येथे इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान संघातील ३ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्याची सुरुवात झाली. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने १६व्या षटकात आबिद अलीची विकेट गमावली. आबिद केवळ १६ धावांवर जोफ्रा आर्चरच्या चेंडूवर त्रिफळाचीत झाला. तर, पाकिस्तानचा कर्णधार अजहर अली ६ चेंडू खेळत शून्य धावांवर पव्हेलियनला परतला. इंग्लंडच्या क्रिस वोक्सने १९व्या षटकात त्याला पायचीत केले.
परंतु, सलामीला फलंदाजीसाठी उतरलेला मसूद (४६ धावा) अर्धशतकाच्या खूप जवळ आहे. तर, चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या बाबर आझमने नाबाद ६९ धावा केल्या आहेत. मात्र, पावसामुळे खेळ थांबवण्यात आला. अशाप्रकारे कसोटी सामन्याचा पहिला दिवस पाकिस्तान पहिल्या डावात २ बाद १३९ धावांवर असताना थांबवण्यात आला. सध्या पाकिस्तानकडून मसूद आणि आझम नाबाद खेळत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
हा भारतीय खेळाडू असा आहे, ज्याची चर्चा राष्ट्रपती- पंतप्रधान करतात
आयोध्येतील राम मंदिर भूमिपूजन सोहळ्यावर मोहम्मद कैफन केला ट्विट, लोकांना
ट्रेंडिंग लेख –
चौथ्या क्रमांकानंतर फलंदाजीला येत २५ ओव्हरच्या आत शतक करणारे जगातील २ अवलिया क्रिकेटर
एकाच वनडे सामन्यात दोनही कर्णधारांनी ५ वेळा केली आहेत खणखणीत शतकं, कोहलीने तर