---Advertisement---

‘तर आमची घरं जळतील, २ लाख डॉलर घेऊन पराभूत व्हा’, शेन वॉर्नचा पाकिस्तानी कर्णधाराबाबत खळबळजनक खुलासा

On: शनिवार, जानेवारी 8, 2022 5:26 PM
Shane Warne
---Advertisement---

ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्न (Shane Warne) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत येत राहातो. तसेच निवृत्तीनंतर बऱ्याचदा तो त्याच्या वैयक्तीक आयुष्यातील घटनांमुळेही चर्चेत आला आहे. आता पुन्हा एका वेगळ्याच कारणाने तो चर्चेत आहे. त्याने मॅच फिक्सिंगबद्दल (Match Fixing) खळबळजनक दावा केला आहे. 

वॉर्नने पाकिस्तानचा क्रिकेटपटू सलीम मलिकबाबत (Salim Malik) हा दावा केला आहे. वॉर्नने म्हटले आहे की, सामना पराभूत व्हावा म्हणून त्याला लाच देण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. वॉर्नने ऍमेझॉन प्राईमवर प्रदर्शित होणाऱ्या ‘शेन’ या डॉक्यूमेंट्रीमध्ये याबाबत माहिती दिली आहे. 

वॉर्नने माहिती देताना सांगितले आहे की, २८ वर्षांपूर्वी म्हणजे १९९४ साली कराची येथे पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना झाला होता. या सामन्याच्या चौथ्या दिवशी त्याला २ लाख ७६ हजार डॉलरची लाच देण्याचा प्रयत्न झाला होता आणि ही ऑफर त्याला पाकिस्तानचा कर्णधार सलीम मलिकने दिली होती. तसेच त्याने सांगितले की, त्याला सलीमने भेटायला बोलावले होते.

वॉर्नने असेही सांगितले की, ऑस्ट्रेलियन संघाला ते हा सामना जिंकतील याची पूर्ण खात्री होती. तो म्हणाला, ‘मी त्याला (सलीमला) म्हणालो की, मला वाटते आम्ही उद्या जिंकू. त्यानंतर सलीमने त्याला सांगितले की आम्ही (पाकिस्तान) पराभूत होऊ शकत नाही. तुला माहित नाही की, जर आम्ही घरच्या मैदानावर हरलो, तर आमची घरं जाळली जातील.’

यानंतर वॉर्नने सांगितले की, सलीम मलिकने त्याला आणि त्याच्या संघसहकाऱ्यांना लाच घेण्याची ऑफर दिली होती आणि वॉर्नला वाईड चेंडू टाकण्यासही सांगितले होते. वॉर्न म्हणाला की, हे सर्व ऐकून तो चकीत झाला होता. त्यानंतर त्याला काय बोलावे हे सुचत नव्हते. पण, त्याने ही ऑफर नाकारली. त्यानंतर हे प्रकरण पुढे गेले नाही.

अधिक वाचा – पाकिस्तान क्रिकेटवर मॅच फिक्सिंगची सावली, दोषी आढळल्याने ‘हा’ युवा क्रिकेटर निलंबित

वॉर्नने पंचांवरही साधला निशाणा 
या सामन्यात अखेरच्या दिवशी ऑस्ट्रेलियाला विजयासाठी केवळ ७ विकेट्सही गरज होती. मात्र, हा सामना पाकिस्तान संघ १ विकेटने जिंकला होता. ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला ३१४ धावांचे लक्ष्य दिले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना इंझमाम उल हकने ५८ धावांची खेळी करताना १० व्या विकेटसाठी मुश्ताक अहमदबरोबर ५७ धावांची नाबाद भागीदारी केली होती.

याबाबत बोलताना वॉर्न म्हणाला, ‘आम्ही तो सामना पराभूत व्हायला नव्हता पाहिजे. आम्ही अनेकदा इंजमाम विरुद्ध पायचीतसाठी अपील केले होते, पण पंचांनी त्यावर कोणताच प्रतिसाद दिला नव्हता. मला वाटते, जर त्या सामन्यात एक तटस्थ पंच असायला हवा होता. असे असते, तर कदाचीत सामन्याचा निकाल वेगळा लागला असता.

व्हिडिओ पाहा – युवी अन् भज्जीमुळं भर टीम मीटिंगमध्येच रडला दादा

सलीम मलिकवर बंदी
वॉर्नने सांगितल्यानुसार मॅच फिक्सिंगच्या ऑफरबद्दल ऑस्ट्रेलियन कर्णधार मार्क टेलर, प्रशिक्षक बॉब टेलर यांनाही माहिती देण्यात आली होती आणि सामनाधिकाऱ्यांपर्यंत देखील ही बातमी पोहचली होती. अखेर नंतर २००० साली सलीम मलिक मॅच फिक्सिंग प्रकरणात दोषी आढळला आणि त्याच्यावर आजीवर बंदी घालण्यात आली. त्याने ५७६८ कसोटी धावा आणि ७१७० वनडे धावा केल्या होत्या.

महत्त्वाच्या बातम्या –

…आणि एल्गरने वडिलांना दिलेला शब्द पूर्ण केला!

दुसरी कसोटी गमावल्यानंतर भारतीय क्रिकेटरला आठवला रहाणे; म्हणाला, ‘राहुलऐवजी त्याला कर्णधार…’

कोरोनाचा विस्फोट झाल्याने बिग बॅशबाबत क्रिकेट ऑस्ट्रेलियाने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय

युवी अन् भज्जीमुळं भर टीम मीटिंगमध्येच रडला दादा |When Yuvraj’s Prank Made Ganguly Cry

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---